Breaking

Monday, January 10, 2022

पुण्यात इंजिनिअरने केलं धक्कादायक कृत्य; किरकोळ वादानंतर शेजाऱ्याला... https://ift.tt/31HTh7M

पुणे : पुण्यातील बिबवेवाडीत सुखसागर नगर परिसरात सुरू असलेल्या बांधकामाचा कचरा शेजारच्या घरावर पडल्यामुळे झालेल्या वादातून इंजिनिअरने रागाच्या भरात एकाच्या छातीत चाकू भोसकून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी इंजिनिअरला अटक केली आहे. () शरद सीताराम पुरी (वय ३५, रा.सुखसागर नगर भाग दोन, बिबवेवाडी) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी सचिन विठ्ठल कपटकर (वय ४६, रा. घर नंबर २४६, सुखसागर नगर भाग दोन, लेन नंबर पाच बिबवेवाडी पुणे) याला अटक केली आहे. बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीत सुखसागर नगर भाग दोनमध्ये पुरी आणि कपटकर शेजारी-शेजारी राहण्यास आहेत. पुरी हे व्यावसायिक असून कपटकर हा इलेट्रिकल इंजिनिअर आहे. सध्या त्याला कोणताही कामधंदा नव्हता. त्याच्या घराशेजारीच पुरी यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्या बांधकामाचा कचरा कपटकर याच्या घरावर पडत होता. कपटकर यांच्या घरावर कचरा पडल्याने या दोघांमध्ये भांडणे होत होती. सोमवारी सकाळी देखील त्यांच्यात याच कारणावरून वाद झाले. त्यावेळी आरोपी कपटकर याने रागाच्या भरात पुरी यांच्या छातीत चाकू भोकसला. यामध्ये गंभीर जखमी होऊन पुरी यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी कपटकर याला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3qaOV2h

No comments:

Post a Comment