: क्राईस्टचर्च : आणि (NZ vs BAN) यांच्यातील दुसरा कसोटी सामना रविवारपासून (९ जानेवारी) सुरू झाला आहे. हा सामना क्राईस्टचर्च येथील हँगली ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने धमाकेदार सुरुवात केली आणि अवघ्या एका विकेटच्या मोबदल्यात ३४९ धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा कर्णधार १८६ आणि डेव्हॉन कॉन्वे ९९ धावांवर खेळत आहेत. यावेळी पहिल्याच दिवशी किवी कर्णधार आणि सलामीवीर टॉम लॅथमला एकाच षटकात दोनदा बाद घोषित करण्यात आले, पण दोन्ही वेळा तो रिव्ह्यूमुळे वाचला. बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार टॉम लॅथम आणि विल यंग या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी १४८ धावांची जबरदस्त भागीदारी केली. विल यंगने ११४ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या. शरीफुल इस्लामने त्याला बाद करून ही भागीदारी तोडली. यानंतर टॉम लॅथम आणि डेव्हन कॉन्वे यांच्यातही जबरदस्त भागीदारी झाली. टॉम लॅथम आणि डेव्हन कॉनवे यांच्यात द्विशतकी भागीदारी टॉम लॅथम आणि डेव्हन कॉन्वे या दोन्ही फलंदाजांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत २०१ धावांची मॅरेथॉन भागीदारी झाली आहे. कर्णधार टॉम लॅथम त्याच्या द्विशतकापासून काही पावले दूर आहे. त्याने आत्तापर्यंत २७८ चेंडूंचा सामना केला असून आपल्या डावात २८ चौकार मारले आहेत. दुसरीकडे, डेव्हन कॉन्वे देखील त्याच्या शतकापासून फक्त एक धाव दूर आहे. त्याने आतापर्यंत १४८ चेंडूंचा सामना केला असून या खेळीत त्याने १० चौकार आणि १ षटकार लगावला आहे. बांगलादेशच्या गोलंदाजांना विकेट घेण्यात आतापर्यंत अपयश आले आहे. किवी संघ दुसऱ्या दिवशी किती मोठी धावसंख्या उभारतो, हे पाहावे लागेल. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर न्यूझीलंडने जबरदस्त पुनरागमन केल्याचे यावेळी पाहायला मिळाले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3f92k4R
No comments:
Post a Comment