नवी दिल्ली: चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि अन्य १३ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या घडल्याचा निष्कर्ष प्राथमिक चौकशी अहवालात काढण्यात आला. हा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. ( ) वाचा : हवामानातील बदलामुळे वैमानिकाचा भौगोलिक स्थितीचा अंदाज चुकला आणि त्यामुळे अपघात घडल्याचे हवाई दलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. चौकशीत अपघातामागे यांत्रिक बिघाड, घातपात किंवा दुर्लक्ष अशी कारणे नसल्याचे समोर आले आहेत. वाचा : ८ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या अपघातावरील प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. या चौकशीत तपास पथकाने हेलिकॉप्टरचा फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचाही अभ्यास केला. याशिवाय सर्व साक्षीदारांचे जबाबही घेण्यात आले. यातून या अपघाताचे नेमके कारण काय असू शकते, याचा अंदाज घेण्यात आला. या अहवालात हेलिकॉप्टरच्या अपघाताला अचानक बदललेले हवामान आणि त्यानंतर हेलिकॉप्टरचा ढगांमध्ये प्रवेश हे कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तमिळनाडूच्या कोइम्बतूर आणि सुलूरदरम्यानच्या या ठिकाणी हा अपघात झाला. इथल्या निलगिरीच्या डोंगराळ प्रदेशात हेलिकॉप्टर कोसळल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अहवालात काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. अहवाल केला सार्वजनिक एअर मार्शल यांच्या नेतृत्वाखालील समितीने या दुर्घटनेची चौकशी केली. या चौकशीचा विस्तृत अहवाल देशाचे संरक्षणमंत्री यांच्याकडे देण्यात आला आहे. हा अहवाल सार्वजनिक करण्यात आला असून भारतीय हवाई दलाशी संबंधित एखाद्या दुर्घटनेचा अहवाल सार्वजनिक करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/34RLc1E
No comments:
Post a Comment