Breaking

Monday, January 10, 2022

करोना रुग्णसंख्येत घट; मुंबईसह संपूर्ण राज्याला मोठा दिलासा https://ift.tt/3f6CcHJ

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या करोना प्रादुर्भावामुळे चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र मुंबईसह महाराष्ट्रात कालच्या तुलनेत आज सोमवारी घटल्याचं पाहायला मिळालं आहे. रविवारी राज्यात ४४ हजार ३८८ नवीन रुग्णांचं निदान झालं होतं, तर आज ३३ हजार ४७० नवे रुग्ण आढळले आहेत. () राज्यात आज २९ हजार ६७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर राज्यात आजपर्यंत एकूण ६६,०२,१०३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९५ टक्के एवढं झालं आहे. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूसंख्येतही आज घट झाली असून ८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०३ टक्के एवढा आहे. दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,०७,१८,९११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६९,५३,५१४ (९.८३टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,४६,७२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५०५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. ओमिक्रॉन संसर्गाची काय आहे स्थिती? राज्यात आज ३१ ओमिक्रॉनबाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांनी रिपोर्ट केले आहेत. यामध्ये पुणे शहरात २८, पुणे ग्रामीणमध्ये २, तर पिंपरी चिंचवडमधील एका रुग्णाचा समावेश आहे. आजपर्यंत राज्यात एकूण १२४७ ओमिक्रॉन विषाणूबाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3F7QlPn

No comments:

Post a Comment