: केपटाऊन : भारतीय क्रिकेट संघासाठी गेल्या काही वर्षांपासून कायम मधली फळी डोकेदुखीचे कारण राहिली आहे. कर्णधार , माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत, म्हणून वारंवार टीका झाली, पण आणखी एक फलंदाज आहे, ज्याने बऱ्याच काळापासून मोठी खेळी खेळली नाही आणि तो अजूनही खराब फॉर्मशी झुंजत आहे. यष्टीरक्षक फलंदाज दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आतापर्यंत झालेल्या पाचही डावात फ्लॉप ठरला आहे. बेजबाबदार शॉट्स खेळल्यामुळे तो अनेकांच्या निशाण्यावर आला आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही त्याच्याशी एकदा बोलण्याची वेळ आली आहे, असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर आता भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही रिषभ पंतविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. व्हर्चुअल पत्रकार परिषदेत विराट म्हणाला की, 'रिषभ पंत ज्या प्रकारचा शॉट खेळून बाद झाला, त्याबाबत सरावावेळी त्याच्याशी संवाद साधला आहे. प्रत्येक फलंदाजाला माहित आहे की, त्याने काय चूक केली आहे. कोणत्या परिस्थितीत त्याने कोणता शॉट खेळायला पाहिजे होता, हे फलंदाजाला माहीत असते. पंतच्या चुका पाहून विराटला झाली धोनीची आठवण कोहली म्हणाला की, 'धोनीने मला सांगितले होते की, जर तुम्ही एकच चूक दुसऱ्यांदा केली, तर त्यामध्ये दोन्हीमध्ये ७ ते ८ महिन्यांचे अंतर असावे. तरच तुमची कारकीर्द मोठी होऊ शकते. मला हे समजले आणि मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.'' पंतने चूक केल्याचे कोहलीने कबूल केले, पण चूक सुधारण्यासाठी पंत नेहमीच तयार असतो आणि लवकरच तो पुन्हा चांगल्या प्रकारे कमबॅक करेल, असे कोहलीला वाटते. पंतचा फ्लॉप शो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पंतची बॅट शांत आहे. त्याने ४ डावात १४.७५ च्या सरासरीने ५९ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ३४ धावा आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात पंत फक्त ३ चेंडू खेळून शून्यावर बाद झाला होता. पंतने पुढे जाऊन रबाडाच्या चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू बॅटला लागून यष्टीरक्षकाच्या हातत गेला. पंतच्या या बेजबाबदार शॉटवर सगळीकडून टीका होत होती. धाडस आणि मूर्खपणा यात फरक आहे आणि तो फरक समजून घ्यायला हवा, असा सल्लाही गौतम गंभीरने पंतला दिला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3JZ0zW1
No comments:
Post a Comment