मुझफ्फरनगर: निवडणुकीची रणधुमाळी रंगली असताना आता तिकीट वाटपावरून राडे सुरू झाले असून बसपाच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या स्थानिक नेत्याबाबत घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा नेता आपली फिर्याद घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहचला आणि तिथे आपली व्यथा मांडताना त्याला अश्रू आवरता आले नाहीत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ( ) वाचा : बसपाचे मुझफ्फरनगरमधील स्थानिक नेते यांनी जो आरोप केला आहे त्याने उत्तर प्रदेशात मोठी खळबळ उडाली आहे. राणा यांनी बसपाचे पश्चिम उत्तर प्रदेश प्रभारी यांना लक्ष्य केले आहे. 'उमेदवारी देण्याच्या नावाखाली राईन यांनी माझ्याकडून ६७ लाख रुपये उकळले आणि आता माझा पत्ता कापून दुसऱ्याच व्यक्तीला उमेदवारी देण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप राणा यांनी केला. राणा यांनी थेट पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली आहे. तिथे पोलीस निरीक्षकांपुढे आपली फिर्याद मांडताना राणा यांच्या अश्रूंचा बांध फुटला मग पोलिसांनी त्यांना सावरले. वाचा : 'माझ्याच पक्षाचा नेता माझ्या भावनांशी खेळला आहे. मला उमेदवारी दिली जाणार असे २०१८ मध्ये या नेत्याने जाहीर केले. त्यानुसार मतदारसंघाचे प्रभारीपदही मला दिले गेले. त्यानंतर मी निवडणुकीची तयारी सुरू केली. वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिल्या. प्रचारासाठी होर्डिंग लावले. पोस्टर्सवर खर्च केला. इतकं सगळं केल्यानंतर आता दुसऱ्याच व्यक्तीला उमेदवारी दिली जाणार असे मला सांगितले जात आहे. हा माझ्यावरचा अन्याय असून मला न्याय मिळाला नाही तर मी लखनऊमध्ये जाऊन यांच्या घरासमोर आत्मदहन करेन', असा इशाराच राणा यांनी दिला. मी गेल्या २४ वर्षांपासून निष्ठेने बसपाचे काम करत आहे. अनेक पदांची जबाबदारी मी सांभाळली. असं असताना ऐनवेळी मला डावललं जात आहे, असेही राणा म्हणाले. दरम्यान, राणा यांच्या तक्रारीची पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली असून याबाबत पोलिसांनी कोणतीही अधिक तपशील दिला नाही. वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3A1KuKP
No comments:
Post a Comment