मुंबई-गेल्या दोन वर्षांपासून अनेक कलाकार करोनामुळे गरिबीशी झुंजत आहेत. काही कलाकारांनी सोशल मीडियावर आर्थिक मदतीची मागणी केली होती तर काहींनी आपलं जीवन संपवलं. आता आणखी एका अभिनेत्याने बिकट आर्थिक परिस्थितीमुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. या अभिनेत्याने कपिल शर्मासोबतही काम केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या अभिनेत्याचं नाव आहे, जे नाना पाटेकरसारखा दिसणारा अभिनेता म्हणून अधिक प्रसिद्ध आहेत. तीर्थानंद राव गेल्या १५ वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत होते, मात्र २७ डिसेंबर रोजी त्यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने शेजाऱ्यांना हा प्रकार कळताच त्यांनी तीर्थानंद यांना तातडीने इस्पितळात नेले. तीर्थानंद यांची प्रकृती ठीक असून खूप प्रयत्नांनंतर डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवले. आर्थिक विवंचना, कुटुंबाने सोडली साथ, पत्नीने केलं दुसरं लग्न तीर्थानंद यांच्याशी बोलले असता त्यांनी सांगितले की ते आर्थिक संकटाचा सामना करत आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांदेखील त्यांची साथ सोडली. विष प्यायल्यानंतर ते इस्पितळात असताना त्यांची आई आणि भाऊ त्यांना भेटायलाही आले नाहीत. तीर्थानंद यांनी सांगितलं की ते आणि त्यांचं कुटुंब एकाच कॉम्प्लेक्समध्ये राहतात, परंतु गेल्या १५ वर्षांपासून त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्याशी बोलत नाहीत. सध्या कर्जबाजारी झाल्याचे तीर्थानंद यांनी सांगितले. त्याच्या उपचारासाठी कुटुंबाने एक रुपयाही खर्च केला नाही. यामुळे उचलले आत्महत्येचे पाऊल तीर्थानंद यांनी सांगितले की, ते इस्पितळातून आल्यापासून घरीच आहेत, कुटुंबातील कोणतीही व्यक्ती त्यांना भेटायला आला नाही किंवा त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली नाही. तीर्थानंद यांच्या पत्नीनेही दुसरं लग्न केलं. त्यांना एक मुलगी आहे, तिचं लग्न झालं असून तिच्याशीही अभिनेत्याचा कोणताही संपर्क नाही. जेव्हा तीर्थानंद यांना विचारण्यात आले की, त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, तेव्हा त्यांनी सांगितलं की, ते काम आणि कुटुंब या पेचात अडकले आहेत. काम आटोपून घरी आल्यावर घरातला एकटेपणा त्यांना खायला उठतो. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं. आणि श्वेता तिवारी यांच्यासोबत केलं काम तीर्थानंद यांनी कपिल शर्मासोबत 'कॉमेडी सर्कस के अजूबे' मध्ये काम केलं होतं. याशिवाय त्यांनी कपिलच्या कॉमेडी शोमध्येही काम केलं आहे. तीर्थानंद यांनी सांगितले की त्यांनी श्वेता तिवारी आणि अगदी भारती सिंग यांच्यासोबतही काम केलं आहे. तीर्थानंद यांनी सांगितलं की, जेव्हा कपिल आणि सुनील ग्रोवरचं भांडण सुरू होतं, तेव्हा कपिलने त्यांना त्या पात्राच्या भूमिकेसाठी बोलावले होते. त्यावेळी तीर्थानंद दुसऱ्या चित्रपटात काम करत असल्याने ते कपिलच्या शोमध्ये सहभागी होऊ शकले नव्हते. तीर्थानंद म्हणाले की, आता ते बरा झाल्यावर कपिलला कामासाठी विचारणार आहे. तीर्थानंद म्हणाले की, मी १५ वर्षांपासून अभिनय करत असून पाच भाषांमध्ये काम केलं आहे. त्यांनी भरपूर पैसे कमावले, पण आता ते अडचणीत आले असून कामाच्या शोधात आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3tjctV1
No comments:
Post a Comment