Breaking

Friday, January 14, 2022

पालकांनो...लहान मुलांवर लक्ष ठेवा! मकर संक्रांतीलाच १० वर्षीय मुलाचा करूण अंत https://ift.tt/3GxhXir

: मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडवताना विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागून बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता कुसूंबा येथे घडली. हितेश ओंकार पाटील (८, रा. गणपतीनगर, कुसूंबा) असं मृत बालकाचं नाव आहे. () कुसूंबा येथील गणपती नगरात हितेश हा वडील, आई व बहिणीसह वास्तव्यास होता. तो इयत्ता चौथीला शिक्षण घेत होता. शुक्रवारी हितेश हा मकर सक्रांतीच्या निमित्ताने घराबाहेर पतंग उडवण्‍यासाठी गेला. साई सिटी बिल्डिंगजवळ पतंग उडवत असताना, अचानक पतंग ही उच्च दाबाच्या वीज वाहिनी तारेत अडकली. ती पतंग काढत असताना हितेश याचा वीज तारेला स्पर्श झाला आणि क्षणीच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. हा प्रकार तेथील एका व्यक्तीला कळताच, त्याने आरडा-ओरड केली. त्यानंतर कुसूंबा गावात राहणारे जिल्हा रूग्णालयातील कर्मचारी बापू ढाकणे यांनी लगेच जखमी अवस्थेत हितेश यास रिक्षात बसवून जिल्हा रूग्णालयात नेले. रस्त्यातच झाला मृत्यू कुसूंबा येथून जिल्हा रूग्णालयात हितेश पाटील या बालकाला घेऊन जात असताना, हितेश याची नेरी नाकाजवळ वाटेतच प्राणज्योत मालवली. रूग्णालयात आणल्यानंतर त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. दरम्यान, बालकाचा फोटो कुसूंबा गावातील व्हॉटसॲपवर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर कुटुंबियांनी मुलाला ओळखताच हितेश याची ओळख पटली. नंतर कुटुंबियांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेत मोठा आक्रोश केला. यावेळी नातेवाईकांसह ग्रामस्थांनी रूग्णालयात गर्दी केली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3KfRdoT

No comments:

Post a Comment