Breaking

Monday, January 3, 2022

रिषभ पंतकडून पहिल्याच दिवशी घडली मोठी चूक, भारतीय संघाला बसला फटका... https://ift.tt/3pRnSJw

जोहान्सबर्ग : पहिल्या दिवस भारतीय संघासाठी चांगला नसल्याचेच पाहायला मिळाले. फलंदाजांनी पहिल्याच दिवशी हाराकिरी केली आणि भारतीय संघ सर्वबाद झाला. पण यावेळी भारताच्या रिषभ पंतकडून एक मोठी चूक घडली आणि याचा मोठा फटका संघाला बसल्याचे पाहायला मिळाले. रिषभ पंतकडून कोणती मोठी चूक झाली, पाहा...भारताने फलंदाजीमध्ये निराशाच केली. त्यामुळे गोलंदाजांकडून चाहत्यांना मोठ्या आशा होत्या. भारताच्या गोलंदाजांनी यावेळी टिच्चून मारा केला. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच्या त्यांनी नाकी नऊ आणले होते. यावेळी एक चांगली संधी भारताकडे चालून आली होती. ही गोष्ट घडली ती १३व्या षटकामध्ये. दक्षिण आफ्रिकेच्या धावा वाढवण्यासाठी किगान पीटरसन हा जोरदार प्रयत्न करत होता. पण त्याचवेळी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने एक वेगवान चेंडू टाकला आणि त्याचा समर्थपणे सामना पीटरसनला करता आला नाही. त्यावेळी पीटरसनच्या बॅटने चेंडूची कडा घेतली आणि हा झेल हा यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातात विसावणार, असे दिसत होते. पण हा सोपा झेल पंतला पकडता आला नाही. पंतने यावेळी झेल घेण्यासाठी प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या हाताला लागून निसटल्याचे पाहायला मिळाले. पंतने यावेळी झेल घेण्याचा प्रयत्न केला नसती तरी चालले असते, कारण पंतच्या बाजूला पहिल्या स्लीपमध्ये असलेला चेतेश्वर पुजारा हा झेल टिपण्यासाठी सज्ज झाला होता. त्यामुळे जर पंतने या चेंडूच्यामध्ये हात टाकला नसता तर तो पुजाराच्या हातामध्ये विसावू शकला असता. पण पंतने झेल घेण्यासाठी यावेळी घाई केल्याचे पाहायला मिळले. त्यामुळे पीटरसनला ११ धावांवर असताना जीवदान मिळाले आणि या जीवदानाचा फायदा पीटरसनने घेतला. दुसरीकडे भारताला जर ही विकेट मिळाली असती तर त्यांना दक्षिण आफ्रिकेवर अधिक दबाव टाकता आला असता. या दबावाखाली दक्षिण आफ्रिकेच्या अजून १-२ फलंदाजांना बाद करत त्यांना पिछाडीवर ढकलण्याची संधी भारताला मिळाली असती. पण पंतने झेल सोडल्यामुळे भारताने ही संधी गमावली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32CRSjz

No comments:

Post a Comment