Breaking

Friday, January 7, 2022

घरात सगळे झोपले होते, लॅच लॉक तोडून दरोडेखोरांनी आत प्रवेश केला आणि... https://ift.tt/3t72d1G

ठाणे : भिवंडीतील येथे आपल्या घरी झोपलेल्या एका वृद्ध महिलेच्या अंगावरून दरोडेखोरांनी चक्क दोन लाखाचे ऐवज चोरल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत घराच्या दरवाज्याला लावलेला लॅच लॉक तोडून घरात घुसले. हे दरोडेखोर घरात घुसताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून त्यांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या मदतीने या दरोडेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. ( at shahapur in bhiwandi items worth of two lakh rs) घराला लॅच लॉक लावून आपल्या घरात झोपलेल्या भेरे कुटुंबियांच्या घरात मध्यरात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत काही दरोडेखोर घुसले. घराला लावलेले लॅच लॉक तोडला, आणि आपल्या बेडरूममध्ये झोपलेल्या वृद्ध महिलेच्या अंगावरील दोन लाखाचे ऐवज चोरून फरार झाले. ही घटना येथील शहापूर मधील चेरपोली येथील आहे. चेरपोलीच्या रिद्धी सिद्धी नगरमध्ये राहणारे संतोष भेरे हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत झोपले असताना हा प्रकार घडला. वाचा- संतोष भेरे यांची आई निर्मला भेरे या त्यांच्या बेडरूममध्ये झोपल्या होत्या. गुरुवारी ६ जानेवारी रोजी मध्यरात्री साडे ३ ते ४ च्या सुमारास आलेल्या दरोडेखोरांनी अचानक त्यांच्या बेडरूममध्ये घुसून त्यांचे तोंड दाबले. त्यांच्या अंगावर असलेले सहा तोळ्यांच्या हातातील सोन्याच्या बांगडया, पन्नास हजाराची एक तोळ्याची सोन्याची गंठण असे हातातील, गळ्यातील, कानातील सोन्याचे दागिने तसेच मनगटातील घड्याळ, लॅपटॉप सह एकूण दोन लाख आठ हजार रुपयांचा ऐवज या दरोडेखोरांनी लंपास केला आहे. घाबरलेल्या निर्मला भेरे यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यानंतर दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. वाचा- आईने केलेला आरडाओरडा ऐकून संतोष भेरे आपल्या बेडरूम मधून बाहेर आले तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. घरातील सीसीटीव्ही बघितला असता त्यांच्या सीसीटीव्हीत चार दरोडेखोर वावरताना आढळून आले. या सीसीटीव्हीच्या मदतीने संतोष भेरे यांनी त्या चार दरोडेखोरां विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शहापूर पोलिसांनी प्रकरणी गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या मदतीने या चारही दरोडेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3eZ0S51

No comments:

Post a Comment