लखनऊ: जिंकण्यासाठी सगळेच पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. त्यात समाजवादी पक्षाने सत्ताधारी भाजपला लागोपाठ हादरे दिले. योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री यांनी राजीनामा देत उत्तर प्रदेशच्या राजकारणात भूकंप घडवला. मौर्य यांच्या रूपाने प्रमुख ओबीसी नेता सपात आल्याने अखिलेश यादव यांना मोठं बळ मिळालं. या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच भाजपने आता सपावर जोरदार पलटवार करण्याची रणनीती आखली आहे. थेट यांच्या घरातच भाजपने फूट पाडल्याचे दिसत आहे. ज्या घडामोडी सुरू आहेत ते पाहता येत्या काळात यूपीतलं राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत. ( ) वाचा: मुलायमसिंह यादव यांची धाकटी सून या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. आता प्रत्यक्षात त्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अपर्णा यादव या लखनऊ येथून आजच दिल्लीला रवाना झाल्या असून त्या उद्या (बुधवार) भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगण्यात येत आहे. अपर्णा यादव दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली. वाचा: भाजपने समाजवादी पक्षाला अनेक धक्के देण्याची योजना आखली आहे. त्यानुसार उद्या दिल्लीत आणि लखनऊमध्येही भाजपात अनेक नेत्यांचे इनकमिंग होईल असे सांगितले जात आहे. यात मुलायम यांचे साडू प्रमोद गुप्ता हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुलायम यांच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे सचिव राहिलेले किशनसिंह अटोरिया हे सुद्धा उद्याच भाजपाचा झेंडा हाती घेणार आहेत. याशिवाय आणखीही काही नेते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता असून याबाबत पत्ते उघडण्यात आलेले नाहीत. दरम्यान, समाजवादी पक्षाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य, धर्मसिंह सैनी, दारासिंह चौहान यांनी राजीनामा देत सपाचा मार्ग धरला आहे. त्याचवेळी मोर्यसमर्थक आमदारही भाजपला रामराम ठोकून सपात गेले आहेत. वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3tAQN6P
No comments:
Post a Comment