मुंबई: अनाथ, उपेक्षित मुलांच्या आयुष्यात पहाट निर्माण करणाऱ्या समाजसेविका याचं आज ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. सिंधूताई सपकाळ यांनी एवढ्यातेवढ्या कारणानं खचून जाणाऱ्या आजच्या युवापिढीसमोर अडचणींना न घाबरता, त्यांचा बाऊ न करता ताठ मानेनं कसं जगता येतं याचा वस्तुपाठ ठेवला आहे. त्यांनी समाजातील प्रत्येक विषयावर रोखठोक मत वेळोवेळी व्यक्त केलं होतं. राजकारण आणि बॉलिवूडमध्ये वादळ निर्माण करणाऱ्या 'मी टू' मोहिमेवर ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी टीकास्त्र सोडलं होतं. अत्याचार झाला तेव्हाच आवाज का उठवला जात नाही. दहा-पंधरा वर्षांनी बोंबलणं चूकच आहे. त्यामुळं निर्दोषही भरडले जातील,' अशी टीका सिंधूताईंनी केली होती. 'मी टू'ची मोहीम अत्यंत वाईट आहे. त्यामुळं निर्दोष लोकांनाही शिक्षा भोगावी लागतेय, असं सागंतानाच अत्याचाराला दहा वर्षानंतरच वाचा कशी फुटू शकते? अत्याचार झाला तेव्हाच का बोललं जात नाही? असा सवालही त्यांनी केला होता. जेव्हा काळजात कळ येते तेव्हा माणूस मुका राहूच शकत नाही, असंही सिंधूताईं म्हणाल्या होत्या.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3zr4EgN
No comments:
Post a Comment