मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते यांचं वयाच्या ९३व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ३० जानेवारी रोजी त्यांनी वाढदिवस साजरा केला होता. रमेश देव यांच्या अचानक जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारलेल्या रमेश देव यांना सिनेसृष्टीतील कलाकारांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. रमेश देव यांनी नुकतीच एका शोमध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर काहीच दिवसांत त्यांच्या निधनाची बातमी आल्यानं धक्का बसल्याचं अभिनेता यानं त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसंच येणाऱ्या काही दिवसांत ते 'चला हवा येवू द्या' मंचावर येणार होते, असंही निलेशनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. काय लिहिलं आहे निलेशनं त्याच्या पोस्टमध्ये? 'मोठा माणूस !या वयातही आम्हाला लाजवेल हा उत्साह आणि शेवट पर्यंत कलाकार म्हणून काम करण्याची इच्छा.हे आम्ही आत्ताच २७ जानेवारीला अनुभवलं. सरांनी 'हे तर काहीच नाय' मध्ये येवून आम्हाला आर्शीवाद दिला . सगळंच स्वप्नवत . त्यांच्या आयुष्यातले मंतरलेले किस्से त्यांनी सांगून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं . तोंडभरून कौतुक केलं . त्या दिवशी खरंच माणसातल्या 'देवाला' भेटल्याचा अनुभव आम्ही घेतला . पुढच्याच आठवड्यात 'चला हवा येवू द्या'मध्ये संपूर्ण कुंटुंबासह ते येणार होते.आत्ता बातमी ऐकून खरंच काही सुचत नाही अशी आमची सर्वांचीच अवस्था झाली आहे . पण २७ तारखेचा तो संपूर्ण दिवस तुमच्या जवळ आम्हाला वावरता आलं , कलाकारातला माणूस कसा असावा आणि किती मोठा असावा याचा अनुभव आम्हाला आला .देव साहेब आपण खरंच ग्रेट आहात , आणि नेहमी रहाल .'
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Hy3YpVDKW
No comments:
Post a Comment