Breaking

Sunday, February 13, 2022

सहलीसाठी गेलेल्या भाजप नगरसेविकेचा अचानक मृत्यू; शहरात खळबळ https://ift.tt/49DC75Q

: जिल्ह्यातील सुरगाणा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १६ मधील नवनिर्वाचित नगरसेविका काशीबाई नामु पवार यांचा गुजरातमधील वापी येथे सहलीसाठी गेलेल्या असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. काशीबाई पवार यांच्या मृत्यूने नाशिकमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. () सुरगाणा नगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या १५ तारखेला होणार असल्याने भाजपचे सर्व नवनिर्वाचित सदस्य गुजरातमधील वापी येथे सहलीसाठी गेले होते. सर्व नगरसेवक एका हॉटेलमध्ये थांबलेले असताना ही घटना घडली. सुरगाणा नगरपंचायतीमध्ये एकूण १७ जागा आहेत. या ठिकाणी सर्वाधिक आठ जागा मिळवत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर शिवसेनेने सहा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा मिळवली आहे. दरम्यान, या नगरसेविकेच्या दुख:द निधनानंतर बहुमतात असलेल्या भाजपचे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र बिघडण्याची शक्यता आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/k1PYiUl

No comments:

Post a Comment