: ग्रामीण विधान क्षेत्रातील येथील शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. आता या घटनेला ४८ तास उलटून गेले आहेत. मात्र अद्याप शिळ डायघर पोलिसांनी गुंडांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केलेली नाही. त्यामुळे शीळ-डायघर पोलीस हे नागरिकांच्या संरक्षणासाठी आहेत की गुंडांच्या संरक्षणासाठी असा सवाल ग्रामस्थ करू लागले आहेत. दरम्यान मोकाट असलेल्या गुंडांकडून आपल्या जीवितास धोका असल्याने शेतकरी कुटुंबाने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. दरम्यान मनसे आमदार राजू पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना ट्विटद्वारे वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आहे. (although 48 hours have passed since the fatal attack on the farmers family no case has been registered) शिळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दहिसर मोकाशी पाडा येथील शेतकरी कुटुंबात गुरुवारी रात्रीच्या सुमारास एका टोळक्याने जीवघेणा हल्ला केला होता. या नंतर पीडित शेतकरी कुटुंबाने तातडीने शिळ डायघर पोलीस ठाणे गाठले होते. पोलिसांनी देखील मारहाणीची तीव्रता पाहत मेडिकल मेमो शेतकऱ्यांना देत वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. वैद्यकीय उपचार घेऊन हा शिळ डायघर पोलीस ठाण्यात पोहोचले देखील मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे. क्लिक करा आणि वाचा- घटनेला ४८ तासांचा अवधी लोटला तरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद नाही असा प्रकार पहिल्यांदाच घडला असल्याचं ग्रामस्थ सांगत आहेत.मात्र असं असलं तरी शेतकरी कुटुंबाने न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. गावात घुसून शेतकऱ्यांवर हल्ला करणारे गुंड हे मोकाट असल्याने शेतकरी कुटुंब हे दहशतीत आहे. त्यामुळे जर राज्यात शेतकरीच असुरक्षित असतील तर इतरांचे काय असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. दरम्यान शीळ - डायघर पोलीस हे नागरिकांच्या संरक्षणासाठी आहेत की गुंडांच्या संरक्षणासाठी असा सवाल ग्रामस्थ करू लागले आता करू लागले आहेत.त्यामुळे आतातरी गुन्हा दाखल करणार का हे पहावे लागेल. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना ट्विट करत पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे आणि ट्विट करत सांगितले की ठाणे येथील डायघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका शेतकरी कुटूंबाला मारहाण झाली. तरीही पोलिस FIR दाखल करत नाहीत. का तर तो आरोपी सेनेचा पदाधिकारी आहे म्हणून ? हा महाराष्ट्र आहे की बिहार?, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान ठाणे सिटी पोलीसांनी मनसे आमदार यांच्या ट्विटला उत्तर देत सांगितले की, आपली तक्रार सहायक पोलीस आयुक्त कळवण्यात यावी, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डायघर पोलीस ठाणे आवश्यक ती कारवाई करावी असे कळवले आहे. मात्र, हे उत्तर येऊन सुद्धा काही तास उलटून गेले आहेत, मात्र अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ot3kfJj
No comments:
Post a Comment