Breaking

Friday, February 11, 2022

आधी मोदींच्या वक्तव्याचा निषेध, नंतर लग्नाच्या बोहल्यावर; बुलडाण्यातल्या 'राजकारणी नवरदेव'! https://ift.tt/hHpCzAF

बुलडाणा : 'बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना' ही म्हण अनेक माणसांच्या अनेक वेळा तोंडात असते किंवा अनेक प्रसंगांत माणूस तशी उपमा देत असतो. पण इकडे बुलडाण्याचा नवरदेव मात्र स्वत:च्या लग्नावेळी आंदोलनामध्ये दिवाना झाला की काय? असा प्रश्न पडावा... त्याचं झालं असं की मुहूर्ताची वेळ जवळ येत असताना आधी मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राजकारणी नवरदेवाने आंदोलनस्थळ गाठलं अन् त्यानंतर तो बोहल्यावर चढला! आधी मोदींच्या वक्तव्याचा निषेध, नंतर लग्न! राज्यात सध्या सगळीकडे काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. जिल्ह्यापासून तालुक्यापर्यंत, अन् गावापासून वाडीपर्यंत, जिथे जिथे काँग्रेस आहे तिथे तिथे काँग्रेस कार्यकर्ते मोदींच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत. बुलढाण्यातील विजय बोंबटकर या नवरदेवाने आपल्या लग्नाच्या मुहूर्ताच्या आधी मोदींच्या वक्तव्याचा निषेध केला, निषेधाचं निवेदन प्रांत कार्यालयात दिलं अन् नंतर बोहल्यावर चढला. नवरदेवाने लग्नमंडपात जाण्याआधी जळगाव जामोद येथील उपविभागीय कार्यालयामध्ये जाऊन वऱ्हाडीमंडळींसोबत पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध केला. नवरदेवाने केलेल्या अभिनव आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं? कोरोनाच्या पहिल्या लाटेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने मजुरांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. त्यामुळे अनंत हाल-अपेष्टा सहन करत या मजुरांना आपापल्या गावी परत जावे लागले. देशात करोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस कारणीभूत आहे. काँग्रेसने महाभयानक संकटातही गलिच्छ राजकारण केले, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केली. त्यांच्या याच वक्तव्यावरुन देशात रणकंदन सुरु आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/aJiDfA4

No comments:

Post a Comment