औरंगाबादः केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या औरंगाबादच्या निवासस्थावर काँग्रेसकडून आज ( शनिवार ) मोर्चा काढण्यात आला होता. मात्र हा मोर्चा काढणं काँग्रेस नेत्यांना चांगलंच महागात पडलं आहे. करोनाचे नियम तोडत रस्त्यावर बसून सार्वजनिक वाहतूक अडवल्याप्रकरणी शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात २० पेक्षा अधिक नेते आणि १०० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. क्रांती चौक पोलिसात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार, क्रांती चौकातील उड्डाणपुलाखाली बेकायदेशीर जमाव जमुन करोनासंबधित कोणतेही नियम न पाळता व सोशल डिस्टसिंगचे उल्लंघन करत, एकत्र जमून घोळका करून क्रांती चौक येथून केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या घराकडे मोर्चा काढून निघाले. मात्र बंदोबस्तावरील पोलिसांनी अडवताच आंदोलनकर्त्यांनी क्रांती चौक ते सिल्लेखाना जाणाऱ्या रोडवर बसून सार्वजनिक रस्ता अडवून धरला. त्यामुळे याप्रकरणी काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचाः े यांच्यावर केला गुन्हा दाखल... औरंगाबाद काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष मोहम्मद हीशाम उस्मानी, रविंद्र शिवाजीराव काळे, संदेश दौलतराव बोरसे, मुजाहिद खान इक्बाल खान, हस्मुद्दिन कट्यारे, अनिल पटेल, जगन्नाथ काळे, मोहसीन खान अजित खान, श्याम गावंडे, मंजू लोखंडे, दिपाली मिसाळ, सरला खरात, अंजली वडजे ,हेमा पाटील, मंजू तायडे, अनिता भंडारी ,दीक्षा पवार यांच्यासह अनोळखी नव्वद ते शंभर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचाः भाजपकडून कराडांच्या घराला संरक्षण.... काँग्रेसने कराड यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा देताच भाजप नेत्यांनी सुद्धा कराड यांच्या घराला कडा घालत संरक्षण दिले. तसेच कराड यांच्या घरावर जर काँग्रेस मोर्चा घेऊन येत असेल तर आम्हीही जश्यास तसे उत्तर द्यायला तयार असल्याची भूमिका भाजप नेत्यांनी घेतली होती. त्यामुळे क्रांती चौक परिसरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. वाचाः
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3NTGwkb
No comments:
Post a Comment