Breaking

Friday, February 4, 2022

भीषण अपघात: इनोव्हावर ट्रक उलटला; दोन महिला पोलिसांसह तिघांचा मृत्यू https://ift.tt/L2meGPO

उन्नाव: उत्तर प्रदेशात येथे भरधाव ट्रक उलटून त्याखाली पोलिसांचे वाहन चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन पोलिसांना जीव गमवावा लागला आहे तर एक पोलीस गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन महिला पोलिसांचा समावेश आहे. ( ) उन्नावमध्ये पोलीस ठाण्याच्या हद्दीत करौंदी येथे पोलीस रिस्पॉन्स व्हेइकलला () हा अपघात झाला आहे. पोलिसांची इनोव्हा गाडी सफीपूर पेट्रोल पंपाच्या दिशेने जात असतानाच उन्नावकडे भरधाव वेगाने येणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. त्याखाली पोलिसांचे वाहन चिरडले गेले. या विचित्र अपघातात पीआरव्हीतील तीन पोलिसांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. अपघातानंतर पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जात स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले आहे. क्रेन मागवण्यात आली असून ट्रक बाजूला करून पोलीस वाहनातील सर्वांना बाहेर काढण्यात आले आहे. कॉन्स्टेबल आनंद हा गंभीररित्या जखमी असल्याचे सांगण्यात येत असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालक कृष्णेंद्र तसेच व या तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pCfShL6

No comments:

Post a Comment