: शहरापासून काही अंतरावर असलेल्या गांधेली शिवारात बंद कारमध्ये नग्न अवस्थेत दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गाडीत अचानक स्फोट झाल्याने दोघांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. तर ही कार शहरातील एका बिल्डरची असल्याची माहिती समोर येत असून मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. () पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरालगतच्या गांधेली शिवारात सहारा सिटीचे काम सुरू आहे. याच्या पाठीमागे मोकळ्या जागेत एक कार बेवारस आढळून आली होती. कारची तपासणी केली असता त्यात आक्षेपार्ह स्थितीत प्रेमी युगुल मृतावस्थेत आढळून आले. कारच्या सर्व काचा बंद असल्याने त्यातील एसीमुळे स्फोट झाला असावा आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच चिखलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक देव गाथ यांनी घटनास्थळी भेट दिली असून पंचनाम्यानंतर दोन्ही मृतदेह घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी आणि स्फोट नेमका कसा झाला, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/J2fohUA
No comments:
Post a Comment