पणजी: भाजप नेते यांना आज पुणे महापालिकेच्या दारात शिवसैनिकांनी रोखले व धक्काबुक्की केली. या घटनेने राजकारण चांगलंच तापलं असून या घटनेवर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी थेट शब्दांत शिवसेनेला इशाराही दिला आहे. ( ) वाचा: देवेंद्र फडणवीस सध्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. तिथे त्यांनी पुण्यातील घटनेवर माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली. 'किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला अतिशय भ्याड आहे. एखादा विरोधात बोलतो म्हणून त्याच्यावर हल्ला करण्याची संस्कृती महाराष्ट्रात कधीच पाहायला मिळाली नाही. असे प्रकार पश्चिम बंगालमध्ये सध्या चालतात. बंगालमधली ही तृणमूल संस्कृती महाराष्ट्रात आणली जात आहे, असे पुण्यातील घटनेवरून स्पष्टपणे दिसत आहे. लोकशाही संपवून विरोधकांना आपल्याविरुद्ध काही बोलूच द्यायचे नाही, अशी जी मानसिकता यामागे आहे ती घातक आहे, असे नमूद करताना फडणवीस यांनी थेट शब्दांत शिवसेनेला इशारा दिला. विरोधात बोललं म्हणून असे हल्ले होणार असतील आणि पोलीस बघ्याची भूमिका घेणार असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आम्हालाही मग वेगळा विचार करावा लागेल. महाराष्ट्रातील लोकशाही शाबूत राहू द्या. ज्यांनी हल्ला केला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणीच फडणवीस यांनी केली. वाचा: सोमय्यांना धक्काबुक्की, पालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले मित्र परिवाराने १०० कोटींचा घोटाळा केल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे. संजय राऊत यांचे भागीदार यांनी बनावट कागदपत्रे दाखवून मुंबई, पुण्यातील कोविड सेंटर्सची कंत्राटे मिळवली व लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या माध्यमातून हा घोटाळा केला, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. याच अनुषंगाने पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी सोमय्या हे आज पुण्यात गेले असता त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सोमय्या यांना पुणे महापालिकेच्या दारातच शिवसैनिकांनी रोखले. वाढता विरोध लक्षात घेत सोमय्या मागे वळले असता मोठी झटापट झाली आणि त्यात सोमय्या हे पायऱ्यांवर कोसळले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी कडे करून सोमय्या यांना गाडीपर्यंत नेले व तिथून सोमय्या माघारी परतले. या घटनेवर भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत असून फडणवीस यांच्याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष यांनीही हल्ल्याचा निषेध केला. अशा हल्ल्यांनी किरीट सोमय्या शांत बसणार नसून कायदेशीर पद्धतीने जशास तसे उत्तर दिले जाईल, असे पाटील म्हणाले. वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/620exVE
No comments:
Post a Comment