Breaking

Wednesday, March 2, 2022

राज्यपालांनंतर रावसाहेब दानवेही वादाच्या भोवऱ्यात अडकणार? म्हणाले, शिवाजी महाराजांचे गुरु..... https://ift.tt/Vx0rKnU

औरंगाबाद: समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचं स्थान काय असतं?' असं विधान राज्याचे राज्यपाल यांनी केल्यानंतर त्यांना मोठा विरोध झाला. राज्यपालांच्याच पावलावर पाऊल ठेवत केंद्रीय राज्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामीच होतो, असं म्हटलं आहे. शाळेत शिकविल्याप्रमाणे तसंच आमच्या माहितीप्रमाणे समर्थ रामदासच शिवरायांचे गुरु होते, असं विधान करत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यपालांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले की, "आमच्या माहितीप्रमाणे समर्थ रामदासच शिवरायांचे गुरु होते. जेवढं आम्ही शिकलो, जेवढं आम्ही वाचलं, जेवढं आम्ही ऐकलं त्याचा आधार घेऊन बोलतोय. आमच्यापेक्षा अधिक वाचणारं कुणी असेल किंवा त्यांच्या वडिलांना, जाणकारांना आमच्यापेक्षा जास्त माहिती असेल तर तो त्यांचा भाग आहे. पण आमची माहिती अशीच आहे की, रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होते". दानवेंपुढील अडचणी वाढणार? "हे आमचं मत आहे, त्यामुळे मत मांडायला आम्ही कुणाला नाही म्हणत नाही. मी माझं मत मांडलं, त्यांनी त्यांचं मत मांडलं, त्यामुळे टीका करण्याचं काय कारण आहे", असंही दानवे म्हणाले. कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात आंदोलनाची धग पाहायला मिळाली होती. आता दानवेंनी देखील छत्रपतींचे गुरु रामदासच असल्याचं म्हटल्याने त्यांच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यपाल नेमकं काय म्हणाले होते? औरंगाबाद शहरातील तापडिया नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या, समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपल्या देशात गुरुची उज्वल परंपरा असून, ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते?. नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, गुरुचे महत्त्व मोठे आहे...!


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jIs2YCu

No comments:

Post a Comment