नंदुरबार : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी विजय मिळवत उमेदवाराचा पराभव केला. या विजयानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर टीकेची झोड उठवली जात असून त्यांना जुन्या वक्तव्याची आठवणही करून दिली जात आहे. अशातच काँग्रेसचे नेते यांनीही पाटील यांना टोला लगावला आहे. ( Chandrakant Patil) 'चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाण्याचा शब्द काही क्षणांत फिरवला असून याबाबत मला आश्चर्य वाटत आहे,' असा चिमटा एकनाथ खडसे यांनी काढला आहे. चंद्रकांत पाटील यांनी शब्द देताना विचार करायला हवा होता किंवा आता त्याचं पालन करायला हवं होतं. मात्र पाटील यांनी अनेकदा अशा घोषणा केल्या, परंतु त्यांची ते अंमलबजावणी करत नाहीत. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता राहिलेली नाही, अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली आहे. 'भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारा निकाल' 'कोल्हापूरचा विजय हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि भविष्यातील दिशा ठरवणारा आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकदिलाने लढले तर कोणत्याही पक्षाचा पराभव करू शकतात, हेच यातून दिसून आलं आहे. या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून भविष्यात अशाच पद्धतीने एकत्र राहण्याची गरज आहे,' असंही एकनाथ खडसे म्हणाले. दरम्यान, राज्यभरात उत्सुकता लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव करत काँग्रेसच्या जयश्री जाधव या १८ हजार ९०२ मतांनी विजयी झाल्या. या निवडणुकीने काँग्रेस नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे जिल्ह्याच्या राजकारणातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, तर भाजपच्या पराभवामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महाडिक गटाला धक्का बसला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/fZq7gyJ
No comments:
Post a Comment