Breaking

Tuesday, April 26, 2022

नवनीत राणा यांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन?; संजय राऊत यांनी केला मोठा गौप्यस्फोट https://ift.tt/1a68Cjy

मुंबई: आणि राणा दाम्पत्य यांच्यात ' हनुमान चालीसा 'वरून वाद भडकला असतानाच शिवसेना नेते यांनी खासदार यांच्यावर सनसनाटी आरोप केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन याच्याशी कनेक्शन असलेल्या युसूफ लकडावाला याच्याकडून नवनीत राणा यांनी ८० लाखांचे कर्ज घेतले होते, असा गौप्यस्फोट करतानाच याबाबत ईडीने चौकशी केली आहे का?, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. ( ) वाचा : याचा कोठडीत मृत्यू झाला आहे. लकडावाला याला सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्याचा संदर्भ देत संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. राणा यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तीकडून कर्ज घेतले असल्याने हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न ठरतो. त्यामुळेच या प्रकरणात चौकशी झाली आहे का, याचे उत्तर ईडीने द्यायला हवे, असे राऊत यांनी नमूद केले आहे. राऊत यांनी नवनीत राणा यांनी घेतलेल्या कर्जाचे पुरावेच दिले असून आणखीही धमाका करण्याचे संकेत दिले आहेत. 'रात अभी बाकी है...बात अभी बाकी हैं... जय महाराष्ट्र!!!', असे एक ट्वीटही राऊत यांनी केले असून त्यात भाजपला टॅग केले आहे. त्यामुळे राऊत आणखी कोणता गौप्यस्फोट करतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ps0ox7c

No comments:

Post a Comment