नवी मुंबई : आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये जे कोणालाच जमलं नाही ते सनरायझर्स हैदराबादने करून दाखवलं. आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांमध्ये गुजरात टायटन्स संघाला कोणालाही पराभूत करता आलं नव्हतं. पण हैदराबादच्या संघाने आज ही गोष्ट करून दाखवली. हार्दक पंड्याच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने हैदराबादपुढे १६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादने दमदार सलामी दिली. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने यावेळी अर्धशतक झळकावले आणि त्यामुळे त्यांना गुजरातवर ८ विकेट्स राखून विजय मिळवता आला. गुजरातसारख्या अपराजित संघाला पराभूत करण्याचा अनोखा विक्रम यावेळी हैदराबादने केला. गुजरातच्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला चांगली सुरुवात मिळाली. केन आणि अभिषक शर्मा यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये दमदार फटकेबाजी केली. केन आणि शर्मा यांनी यावेळी ६४ धावांची सलामी दिली. गुजरातचा फिरकीपटू रशिद खानने यावेळी शर्माला बाद करत हैदराबादला पहिला धक्का दिली. शर्माने यावेळी ३२ चेंडूंत सहा चौकारांच्या जोरावर ४२ धावांची खेळी साकारली. शर्मा बाद झाल्यावर राहुल त्रिपाठी फलंदाजीला आला आणि त्यानंतर हैदराबादची धावगती वाढायला लागली. राहुलने यावेळी ११ चेंडूंत १ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १७ धावा केल्या. षटकार मारताना राहुलला यावेळी दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले. राहुलनंतर फलंदाजीला आला तो वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पुरन. त्यानंतर केनने यावेळी षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले होते. पण त्यानंतर केन लवकर बाद झाला. केनने यावेळी दोन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५७ धावा केल्या. हार्दिकने त्याला बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. तत्पूर्वी, गुजरातचा संघ अडचणीत सापडला असताना हार्दिक फलंदाजीला आला आणि त्याने दमदार फटकेबाजी करत अर्धशतक साकारले. हार्दिकने यावेळी आयपीएमध्ये षटकारांचे अर्धशतक साकारले. हार्दिकच्या नाबाद ५० धावांच्या जोरावर गुजरातला हैदराबादच्या संघापुढे १६३ धावांचे मोठे आव्हान ठेवता आले. हैदराबादचा हुकमी एक्का असलेल्या भुवनेश्वर कुमारने यावेळी गुजरातला पहिला धक्का दिला. भुवीने गुजरातचा सलामीवीर शुभमन गिलला ७ धावांवर बाद केले. त्यानंतर साई सुदर्शनच्या रुपात यावेळी गुजरातच्या संघाला दुसरा धक्का बसला, त्याला ११ धावा करता आल्या. पण त्यावेळी मॅथ्यू वेड हा गुजरातच्या संघाला सावरेल, असे वाटत होते. पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. स्थिरस्थावर झालेला मॅथ्यू वेड आऊट झाला आणि गुजरातला तिसरा धक्का बसला. मॅथ्यूला यावेळी १९ धावा करता आल्या. तीन फलंदाज बाद झाल्यावर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि डेव्हिड मिलर यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला आणि संघाचे शतक पूर्ण केले. पण संघाचे शतक पूर्ण झाल्यानंतर चार धावांमध्येच गुजरातला चौथा धक्का बसला. मिलर आऊट झाला आणि गुजरातला चौथा धक्का बसला, त्याने १२ धावा केल्या. पण हार्दिकने यावेळी अर्धशतकी खेळी साकारत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/W4SONgc
No comments:
Post a Comment