नवी दिल्ली: देशात १९ च्या एक्सई व्हेरिएंटने ( ) शिरकाव केला आहे आणि मुंबईत या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला असल्याच्या बातम्या झळकल्यानंतर अवघ्या काही तासांतच या माहितीत तथ्य नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. संबंधित रुग्ण बाधित आहे असे दिसत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यासाठी जीनोमिक तज्ज्ञांच्या विश्लेषणाचा हवाला देण्यात आला आहे. ( ) वाचा : दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या एका महिलेला करोनाच्या एक्सई व्हेरिएंटची लागण झाल्याचे आढळून आले आहे. महानगरपालिकेच्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. ही महिला १० फेब्रुवारी रोजी मुंबईत आली. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या तपासणीत ती कोविड बाधित आढळली. तिचे नमुने मुंबईतीलच कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात आले होते. या प्राथमिक तपासणीत महिलेला एक्सई व्हेरीएंटची लागण झाल्याचे आढळले. त्यानंतर GISAID च्या तपासणीतही देखील सदर व्हेरिएंट एक्सई असल्याचे स्पष्ट झाले, असे पालिकेचे म्हणणे आहे. यात कोणतीही साशंकता राहू नये यासाठी सदर नमुने राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, अशी माहितीही मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. अशावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी याबाबत वेगळे मत मांडले आहे. वाचा : 'हा एक्सई व्हेरिएंट बाधित रुग्ण असण्याची शक्यता कमी वाटते. तपासणीशी संबंधित जीनोमिक एव्हिडन्स पाहता हा एक्सई व्हेरिएंट आहे असे वाटत नाही' असे आरोग्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नमूद केले आहे. जीनोमिक तज्ज्ञांच्या विश्लेषणाचा हवालाही या अधिकाऱ्याने दिला. दरम्यान, राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेचा याबाबतचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. हा अहवाल निर्णायक ठरणार असून त्यातूनच ही होती की नव्हती हे स्पष्ट होऊ शकणार आहे. ही महिला सध्या पूर्ण बरी झाली आहे. तिचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/4q0MNBw
No comments:
Post a Comment