Breaking

Sunday, April 3, 2022

धोनी खेळला, पण चेन्नईचा संघ पुन्हा हरला; पंजाबने गतविजेत्यांवर साकारला दणदणीत विजय https://ift.tt/5TtGrPa

मुंबई : चेन्नई सुपर सुपर किंग्सला तिसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. हा चेन्नईचा सलग तिसरा पराभव ठरला आहे. पंजाबने चेन्नईपुढे विजयासाठी १८१ धावांचे आलव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची ५ बाद ३६ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर धोनी आण शिवम दुबेची जोडी चांगलीच जमली. शिवमने यावेळी अर्धशतकही साकारले, पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. त्यानंतर धोनी एकाकी झुंज देत होता. यापूर्वी धोनीने असे सामने संघाला जिंकवून दिले होते. पण यावेळी मात्र तो अपयशी ठरला आणि पंजाबने चेन्नईवर ५४ धावांनी मोठा विजय साकारला. धोनीने यावेळी स्थिरस्थावर झाल्यावर फटकेबाजी सुरु केली आणि त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या, पण धोनी यावेळी २८ चेंडूंत २३ धावाच करू शकला. पंजाबच्या १८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात मात्र वाईट झाली. ऋतुराज गायकवाडच्या रुपात चेन्नईच्या संघाला पहिला धक्का बसला. ऋतुराजला यावेळी फक्त एकच धाव करता आली. पंजाबचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने याळी त्याला बाद केले. त्यानंतर तिसऱ्या षटकात यावेळी चेन्नईला दुसरा धक्का बसला. धडाकेबाज सुरुवात करणारा रॉबिन उथप्पा यावेळी १३ धावांवर बाद झाला. चेन्नईच्या संघाला मोइन अलीकडून यावेळी मोठ्या अपेक्षा होत्या. पण मोइनला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर रवींद्र जडेजाच्या रुपात यावेळी चेन्नईला ला मोठा धक्का बसला. कारण चेन्नईचा कर्णधार यावेळी भोपळाही फोडू शकला नाही. आठव्या षटकात यावेळी चेन्नईला पाचवा धक्का बसला. अंबाती रायुडूला ओडेन स्मिथने १३ धावांवर बाद केले. त्यावेळी चेन्नईची ५ बाद ३६ अशी अवस्था झाली होती. चेन्नईचा संघ त्यानंतर लवकर ऑलआऊट होईल, असे वाटले होते. पण त्यानंतर महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला आला आणि चेन्नईची पडझड थांबली. शिवम दुबेने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत आपले अर्धशतक साजरे केले आणि संघाची गाडी रुळावर आणली. शिवम आणि धोनी आता मोठी खेळी साकारून संघाला विजय मिळवून देतील, असे वाटत होते. पण त्याचवेळी लायम लिव्हिंगस्टोनने शिवमला बाद केले आणि ही जोडी फोडली. शिवम दुबेने यावेळी दमदार फलंदाजी करत अर्धशतकी खेळी साकारली. शिवमने यावेळी ३० चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५७ धावा केल्या. शिवमनंतर फलंदाजीला आलेल्या ड्वेन ब्राव्होकडून संघाला मोठ्या आशा होत्या, पण त्याला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. तत्पूर्वी, पंजाबच्या लायम लिव्हिंगस्टोनने दमदार फटकेबाजी करत ६२ धावांची खेळी साकारली खरी, पण त्याला अन्य फलंदाजांची चांगली साथ मिळाली नाही आणि त्यामुळेच पंजाबच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चांगली फटकेबाजी करूनही पंजाबच्या संघाला दोनशे धावांचा पल्ला गाठता आला नाही. पण त्यांना निर्धारीत २० षटकांमध्ये १८० धावा उभारता आल्या.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pg4GsH3

No comments:

Post a Comment