म. टा. प्रतिनिधी, आजारी पत्नीच्या उपचाराचा खर्च भागविण्यासाठी एका तरुणाने तीन मित्रांच्या मदतीने एका व्यावसायिकाला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (In Pune, a young with the help of three ) क्लिक करा आणि वाचा- पांडुरंग सदाशिवी कुरणे (वय ४२, रा. गणपती माथा मंदिर, वारजे माळवाडी) हे १४ एप्रिलला सायंकाळी साडेसातच्या सुमारास उंड्री परिसरातून जात होते. त्यावेळी त्यांच्याकडे दिवसभराच्या व्यवसायातून जमा झालेली १० हजार रुपयांची रोकड, लॅपटॉप होता. ते उंड्री येथील प्रिन्स टाऊन रॉयल सोसायटी समोरील मोकळ्या जागेत लघुशंकेसाठी थांबले असता, अनोळखी तीन व्यक्तींनी तक्रारदाराला कोयत्याने मारून केली. त्यांच्याकडील लॅपटॉप, रोकड आणि बँकेची इतर कागदपत्रे बळजबरी घेऊन पसार झाले होते. क्लिक करा आणि वाचा- कुरणे यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकाराची तक्रार दिली होती. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/NzZ0DFQ
No comments:
Post a Comment