कोल्हापूर: 'ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, ते सांप्रदायिक आणि धार्मिक तेढ वाढवत मतांचा जोगवा मागत आहेत, अशा काळात देश एकसंघ ठेवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर असल्याने संकुचित विचारांना खड्यासारखं बाजूला सारा,' असे आवाहन पक्षाचे अध्यक्ष यांनी कोल्हापुरात केले. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत विरोधकांची तोंडं बंद करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही पवारांनी प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने दिला. ( ) वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर काढण्यात आलेल्या परिवार संवाद यात्रेचा समारोप शनिवारी कोल्हापुरात झाला. तपोवन मैदानावर प्रचंड जनसमुदायच्या उपस्थितीत पक्षाची संकल्प सभा घेण्यात आली. यावेळी शरद पवार बोलत होते. आगामी निवडणुकीत राज्यात नंबर एकचा पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे राज्यातील सर्व मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी या संकल्प सभेत उपस्थित होते. सर्वच वक्त्यांनी आणि मनसेचे अध्यक्ष यांचा आपल्या भाषणात चांगलाच समाचार घेतला. तोच धागा पकडत शरद पवार बोलले. 'मी भाषणात फक्त शाहू, फुले आणि आंबेडकर यांचीच नावे घेतो असा सवाल करतात, त्यांना महाराष्ट्र कळलाच नाही', असा टोला पवारांनी या सभेत मारला. शिवाजी महाराज हे आमच्या अंत:करणात आहेत. शाहू, फुले आणि आंबेडकरांनी समतेचा विचार घराघरात पोहोचवला त्यामुळे त्यांची नावे आम्ही घेतो, असेही पवार म्हणाले. वाचा : पवार पुढे म्हणाले, 'हा देश एकसंघ ठेवण्याचे फार मोठे आव्हान सध्या आपल्यासमोर आहे. सात वर्षांपूर्वी देशात वेगळी परिस्थिती होती. भाजपच्या हातात सत्ता आल्यापासून माणसांचं दु:ख कमी करण्यापेक्षा माणसांमाणसांत अंतर निर्माण केलं जात आहे. दिल्लीत नुकतीच जाळपोळ झाली. तेथे सरकार केजरीवाल यांचे असले तरी जबाबदारी केंद्रातील गृहखात्याची आहे. देशात सत्ता असणाऱ्या अमित शहा यांना दिल्ली सांभाळता येत नाही, हे दंगलीवरून सिद्ध होते. भाजपच्या हातात सत्ता गेल्यापासून जातीयवादाचे आव्हान वाढले आहे. यामुळे देश अडचणीत येत आहे. या पार्श्वभूमीवर जातीय संघर्ष वाढवून मतांचा जोगवा मागण्याचे काम भाजप करत आहे. अशा जातीय शक्तींना खड्यासारखे बाजूला सारायला हवे.' वाचा : 'ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, ते देशाचा विचार करताना दिसत नाहीत. कारण परदेशातील प्रमुख आल्यानंतर पूर्वी ते मुंबई, कोलकाता, हैदराबाद अशा अनेक शहरांना भेटी देत होते पण अलीकडे कुणीही आला तर गुजरातला जातो. त्यामुळे देशाला संकुचित विचार देण्याचा हा प्रयत्न आहे', असा आरोप पवारांनी केला. ईडी, सीबीआय यासह अनेक केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, चुकीच्या व खोट्या गुन्ह्यांत अडकवले जात आहे, पण अशाने आमची तोंडं बंद करू, असे कुणाला वाटत असेल तर ते मुर्खाच्या नंदनवनात वावरत असल्याचे दिसते. अशी कितीही संकटे येवोत, आम्ही त्याचा योग्यवेळी समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशाराच पवारांनी दिला. प्रचंड गर्दी, नेत्यांची टोलेबाजी संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते या सभेला आले होते. यामुळे प्रचंड गर्दी झाली होती. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी केंद्रिय मंत्री प्रफुल्ल पटेल, राज्याचे मंत्री छगन भुजबळ, खासदार अमोल कोल्हे, यांच्यासह अनेकांनी चांगलीच टोलेबाजी केली. महाराष्ट्र कधीही दिल्लीपुढे झुकणार नाही, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला. २०२४ ला पुन्हा आघाडी करू आणि राज्यात राष्ट्रवादीला एक नंबरचा पक्ष म्हणून ताकद उभी करू, असा संकल्प यावेळी करण्यात आला. वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KveFmUh
No comments:
Post a Comment