परभणी: दाम्पत्याने एकाच खोलीमध्ये घेऊन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मसनेरवाडी येथे घडली आहे. या घटनेमध्ये पतीचा मृत्यू झाला आहे. तर, दोरी तुटल्यामुळे आठ महिन्याची गर्भवती बालंबाल बचावली आहे. माधव भाऊसाहेब मिसे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. (in husband and wife attempted at home in which husband dies and wife survives) क्लिक करा आणि वाचा- गंगाखेड तालुक्यातील मसनेरवाडी येथील रहिवासी माधव भाऊसाहेब मिसे आणि अरुणा मिसे यांचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांना दोन मुली आहेत. मिसे दाम्पत्य नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री आपल्या खोलीमध्ये झोपले. मात्र, गुरुवारी १४ एप्रिल रोजी सकाळी ते खोलीतून बाहेर आले नाहीत. यामुळे माधव मिसे यांचा भाऊ आणि ग्रामस्थांनी खोलीच्या खिडकीतून आत पहिले असतात दोघांनीही गळफास घेतल्याचे दिसून आले. क्लिक करा आणि वाचा- त्यानंतर ग्रामस्थ दरवाजा तोडून आत गेले असता माधव मिसे यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. तर दोरी तुटल्याने अरुण मिसे बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र अरुणा मिसे यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे अरुणा मिसे या आठ महिन्याच्या गर्भवती आहेत. दरम्यान, या दाम्पत्याने असा टोकाचा निर्णय का घेतला याचे कारण स्पष्ट झालेले नाही. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/L8C1X3d
No comments:
Post a Comment