Breaking

Thursday, April 21, 2022

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या १२ तासांत रद्द का झाल्या?; फडणवीस म्हणाले... https://ift.tt/Exl1NXG

नागपूर: महाआघाडी सरकारकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून पोरखेळ सुरू असल्याचा थेट हल्ला चढवत ‘बदल्या रद्द करण्याचे कारण कोणते’, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी केला. ( ) वाचा : नागपूर येथे आगमन झाले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. करणे आणि लगेच त्यास स्थगिती देणे, असा खेळ चालला आहे. अलीकडेच दहा उपायुक्तांच्या बदल्या करून नंतर त्या रद्द केल्या. काही बदल्यांची सीबीआयमार्फत चौकशी सुरू आहे. बदली घोटाळ्यात याचा उल्लेख असतानाही सरकारकडून परत तसेच कृत्य केले जात आहे. बुधवारी केलेल्या बदल्या बारा तासांत थांबवण्यामागे कोणती कारणे आहेत, याचा खुलासा राज्यकर्त्यांनी करावा, असेही ते म्हणाले. भाजपकडून रोज होणाऱ्या पोलखोलमुळे सत्तारुढ नेते अस्वस्थ आहेत. त्यातूनच भाजपच्या रथावर हल्ला करण्यात आला. राज्यकर्त्यांनी आमचा आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी पोलखोल थांबणार नाही. पोलिसांनी हल्लेखोरांना संरक्षण दिल्यास त्यांचीही पोलखोल केली जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. वाचा : आधी इंग्रजांची राजवट होती, आता सुरू असल्याची टीका करून देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मंत्री लांगूलचालन करत असल्याने दोन समाज परस्परांसमोर उभे ठाकतात. परिणामी, स्थिती आणखी वाईट होत आहे. अचलपूर येथेही तसेच झाले. हिंदू समाजाला लक्ष्य करण्यात येत असल्याने तणाव वाढत आहे. पोलिसांनी असले प्रकार तत्काळ थांबवावेत.’ राऊतांना सुबुद्धी येईल! शिवसेनेचे खासदार यांच्यावर एरवी बोलण्याचे टाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मात्र चिमटा काढला. त्यांच्या दौऱ्याकडे लक्ष वेधले असता, ‘नागपूरची माती आणि वातावरणात वेगळेपण आहे. शहरात त्यांचे आगमन झाल्यास त्यांना सुबुद्धी येईल’, अशी कोपरखळी फडणवीस यांनी लगावली. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jhW5u3G

No comments:

Post a Comment