Breaking

Tuesday, April 26, 2022

आरसीबीवर दणदणीत विजयासह राजस्थानने गुणतालिकेत केला मोठा बदल, पाहा नेमकं काय घडलं... https://ift.tt/F1oP8Mh

पुणे : राजस्थान रॉयल्सच्या संघाने आरसीबीच्या संघावर दमदार विजय मिळवला आणि त्यामुळेच गुणतालिकेत मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. राजस्थानने आरसीबीपुढे विजयासाठी १४५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली आणि राजस्थानने २९ धावांनी विजय साकारला. या सामन्यापूर्वी राजस्थानचा संघ हा गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता आणि त्यांचे १० गुण होते. पण या विजयासह राजस्थानने दोन गुणांची कमाई केली. त्यामुळे राजस्थानचे आता १२ गुण झाले असून त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. राजस्थानचे १४५ धावांचे आ्हान माफक वाटत होते. पण आरसीबीची सुरुवात यावेळी चांगली झाली नाही. आरसीबीला पहिलाच धक्का यावेळी विराट कोहलीच्या रुपात बसला होता.कोहली यावेळी धावांची मरगळ झटकून टाकण्यासाठी सलामीला आला होता. पण यावेळी मोठी खेळी साकारण्यात कोहली पुन्हा अपयशी ठरला, त्याला १० धावाच करता आल्या. कोहली बाद झाल्यावर ठरविक फरकाने आरसीबीने विकेट्स गमावल्या. यावेळी आरसीबीची मदार फॉर्मात असलेल्या दिनेश कार्तिकवर होती. पण कार्तिक सहा धावांवर बाद झाला आणि आरसीबीच्या विजयाच्या आशा मावळल्या. तत्पूर्वी, आरसीबीच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार फॅफ ड्यु प्लेसिसचा हा निर्णय आरसीबीच्या गोलंदाजांनी योग्य असल्याचे दाखवून दिले. सलामीवीर देवदत्त पडीक्कलच्या रुपात यावेळी राजस्थानला पहिला धक्का बसला. पडीक्कलला यावेळी सात धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतरच्या संघाने एक मोठा प्रयोग केल्याचे पाहायला मिळाले. राजस्थानच्या संघाने यावेळी प्रयोग करत अश्विनला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले होते. पण अश्विनला यावेळी १७ धावा करता आल्या. त्यावेळी सलामीवीर जोस बटलरकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण जोस बटलरच्या रुपात यावेळी राजस्थानला तिसरा धक्का बसला. बटलरला यावेळी आठ धावांवर समाधान मानावे लागले. राजस्थानला यावेळी एकामागून एक तीन धक्के बसले. त्यावेळी संजू सॅमसनने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी मोठी खेळी साकारण्यात संजूला अपयशआले, संजूला यावेळी २७ धावा करता आल्या. त्यामुळे राजस्थानचा संघ यावेळी अडचणीत सापडला होता. पण यावेळी राजस्थानच्या संघाला यामधून बाहेर काढले ते रायन परागने. कारण परागने यावेळी झुंजार खेळी साकारत अर्धशतक झळकावले. परागने यावेळी ३१ चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ५६ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच राजस्थानच्या संघाला यावेळी १४५ धावांचे आव्हान आरसीबीपुढे ठेवता आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/4X91CUs

No comments:

Post a Comment