Breaking

Monday, April 4, 2022

मी वंशज, पण शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार छगन भुजबळ : संभाजीराजे छत्रपती https://ift.tt/i0KSBPE

नाशिक : "मी छत्रपती शाहू महाराजांचा () वंशज आहे. पण मंत्री () शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत", अशी स्तुतीसुमने राज्यसभा खासदार छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) यांनी भुजबळांवर उधळली. छत्रपती संभाजीराजेंनी आज नाशकात मंत्री भुजबळ (Sambhajiraje Meet Sambhajiraje) यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं तोंडभरुन कौतुक केलं. "यंदाच्या वर्षी (६ मे) राजर्षी यांची स्मृती शताब्दी आहे. देशात बहुजनांना पहिलं आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी दिले होते. राजर्षी शाहू महाराज यांचे नाशिकशी जिव्हाळ्याचे संबंध होते. शाहू महाराज यांच्या शताब्दीच्या माध्यमातून शाहू महाराज घराघरात पोहचविले जात आहेत, असे सांगतानाच मंत्री छगन भुजबळ हे शाहू महाराज यांच्या विचाराचे वंशज आहेत", असं संभाजी राजे म्हणाले. शाहू महाराज यांनी देशात पहिल्यांदा बहुजन वर्गाला आरक्षण दिलं. त्यानंतर डॉ आंबेडकरांनी घटनेची निर्मिती करुन आरक्षणाला कायद्याचं कवच दिलं. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं.मी त्यांचा वंशज असून त्यांनी केलेलं काम अविरतपणे पुढे सुरु ठेऊन बहुजन समाजाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करेल. पण मी जरी वंशज असलो तरी भुजबळांचं कार्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे. भुजबळ शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे चालवीत आहेत, असं संभाजीराजे म्हणाले. दुसरीकडे भुजबळांनी देखील संभाजीराजेंच्या कामाचं कौतुक केलं. संभाजीराजेंनी खासदार म्हणून अतिशय उत्तम काम केल्याची पोचपावती भुजबळांनी दिली. तर राज्य आणि देश एका वेगळ्या स्थित्यांतरातून जातेय. या देशाला फुले शाहू आंबेडकरांचेच विचार वाचवू शकतात, असं प्रतिपादन भुजबळांनी केलं. माझ्या खासदारकीची टर्म येत्या २ मेपर्यंत आहे, तो पर्यंत आपण कुठलेही राजकीय भाष्य करणार नाही, आता २ मेनंतरच बोलू असे खासदार संभाजी राजे म्हणाले. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार छत्रपतीचा वंशज आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच काय, तर सर्वांशीच माझी जवळीक असल्याचे ते म्हणाले. ओबीसी आरक्षण राज्य सरकारमुळे गेले या देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर मात्र संभाजीराजेनी बोलणे टाळले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/IBbQzx9

No comments:

Post a Comment