मुंबई : एक परीपूर्ण बॉलीवूडचा सिनेमा कसा असावा, याचा प्रत्यय आजच्या राजस्थान रॉयल्स आणि केकेआर यांच्यातील सामन्यात आला. जोस बटलरने अफलातून शतक झळकावत केकेआरच्या गोलंदाजीतली हवाच काढून टाकली. त्यामुळे राजस्थानला २१८ धावांचे आव्हान केकेआरपुढे ठेवता आले. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरच्या आरोन फिंच आणि श्रेयस अय्यर यांनी धडाकेबाज अर्धशतके झळकावली. पण १७व्या षटकात राजस्थानच्या युजवेंद्र चहलने हॅट्रीकसह चार बळी मिळवले आणि सामन्याला कलाटणी दिली. पण त्यानंतर उमेश यादवने दमदार फटकेबाजी करत केकेआरचे आव्हान जीवंत ठेवले होते आणि अखेरच्या तीन चेंडूंमध्ये केकेआरला विजयासाठी ८ धावांची गरज होती. पण त्याचवेळी उमेश यादव आऊट झाला आणि राजस्थानने सामना सात धावांनी जिंकला. त्यामुळे पैसा वसूल सामना झाल्याचे पाहायला मिळाले. या विजयासह राजस्थानच्या संघाने तीन संघांना गुणतालिकेत धक्के दिले आणि दुसरे स्थान पटकावले आहे. चहलने कशी साजरी केली हॅट्रीक पाहा...चहलने यावेळी १७व्या षटकाच्या पहिल्या चेंडूंवर वेंकटेश अय्यरला बाद केले. त्यानंतर या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चहलने केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरला ८५ धावांवर बाद केले. त्यानंतरच्या पाचव्या चेंडूवर चहलने शिवम मावीला तंबूत धाडले. चहलने यावेळी षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पॅट कमिन्सचा काटा काढला आणि आपली हॅट्रीक पूर्ण केली. केकेआरने केला धावांचा पाठलाग...राजस्थानच्या २१८ धावांचा पाठलाग करताना यावेळी केकेआरने आपल्या फलंदाजीत मोठा बदल केला होता. केकेआरने यावेळी सुनील नरिनला सलामीला पाठवण्याचा प्रयोग केला, पण हा प्रयोग यशस्वी ठरला नाही. कारण केकेआरला यावेळी पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. पण पहिल्याच चेंडूवर धावचीत होत तो माघारी परतला. केकेआरची सुरुवात चांगली झाली नसली तरी त्यानंतर आरोन फिंचने अर्धशतक झळकावत संघाला सावरले. फिंचने यावेळी २८ चेंडूंत ९ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५८ धावांची खेळी साकारली. फिंच बाद झाल्यावर श्रेयसने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली, पण तो १७व्या षटकात बाद झाला, त्याला ८५ धावा करता आल्या. बटलरचे दमदार शतकराजस्थानच्या संघाला यावेळी देवदत्त पडीक्कलच्या रुपात पहिला धक्का बसला. केकेआरच्या सुनील नरिनने यावेळी देवदत्त पडीक्कलला २४ धावांवर बाद केले. कर्णधार संजू सॅमसनच्या रुपात राजस्थानला यावेळी दुसरा धक्का बसला. संजूने यावेळी १९ चेंडूंत ३८ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. राजस्थानच्या जोस बटलरने यावेळी यंदाच्या आयपीएलमधील दुसरे शतक साजरे केले. बटलरने यावेळी ५८ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. जोस बटलरच्या तुफानी शतकाच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारता आली. बटलरने यावेळी ६१ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर १०३ धावांची दमदार खेळी साकारली. त्यामुळे राजस्थानला प्रथम फलंदाजी करताना केकेआरपुढे २१८ धावांचे आव्हान ठेवता आले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/c8DMA9e
No comments:
Post a Comment