Breaking

Wednesday, April 20, 2022

सासरा पत्नीला नांदवायला पाठवत नव्हता; जावयाने उचलले धक्कादायक पाऊल https://ift.tt/ojSpcgd

म. टा. प्रतिनिधी, पत्नीला नांदवायला पाठवत नसल्याच्या कारणावरून जावयाने सासऱ्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना खडकी बाजार परिसरात बुधवारी सायंकाळी घडली. खून केल्यानंतर जावई थेट चाकू हातामध्ये घेऊन खडकी पोलिस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. (the took a shocking step by not sending his at his home) रमेश रामचंद्र उत्तरकर (वय ६५, रा. आकाशदिप सोसायटी, खडकी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी अशोक गुलाब कुडले (वय ३८, रा. खडकी बाजार) याला ताब्यात घेतले आहे. खडकी बाजार बस थांब्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एका कपड्याच्या दुकानात बुधवारी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. क्लिक करा आणि वाचा- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश यांचे खडकी बाजार परिसरात रॉयल कट पीस नावाचे कपड्याचे दुकान आहे. आरोपी अशोक हा त्यांचा जावई आहे. अशोक हा त्यांच्या मुलीला त्रास देत असल्यामुळे ती माहेरी निघून आली होती. अशोक हा त्याच्या आईसोबत राहत होता. तर त्याची तिच्या वडिलांकडे राहते. दोघांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले आहेत. उत्तरकर यांची दोन दुकाने असून एक त्यांनी भाड्याने दिले आहे. तर जावई कुडले हा वडापावची गाडी चालवितो. क्लिक करा आणि वाचा- अशोक व त्याच्या पत्नीचा न्यायालयात वाद सुरू आहे. कुडले हा पत्नीला नांदायला पाठवा, असे सांगत होता. तर सासरे घटस्फोट घेण्याचे सांगत होते. त्यातून दोघांत वाद सुरू होते. बुधवारी न्यायालयात तारीख होती. तारीख झाल्यानंतर कुडले व उत्तरकर यांच्यात वाद झाले. उत्तरकर सायंकाळी साडेसातच्या सुमारास कपड्याच्या दुकानात बसले होते. त्यावेळी कुडले याने तेथे येऊन त्यांच्यावर धारधार चाकूने सपासप वार केले. सहा ते सात वार झाल्याने उत्तरकर हे गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाले. त्यानंतर कुडले हा चाकू हातात घेऊन स्वतः खडकी पोलिस ठाण्यात हजर झाला. घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. त्यावेळी उत्तरकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. उत्तरकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णलयात पाठविण्यात आला होता. याप्रकरणी खडकी पोलिस तपास करत आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/USmMWLa

No comments:

Post a Comment