पुणे : लखनौच्या संघाने पंजाब किंग्सवर २० धावांनी दमदार विजय साकारला. या विजयासह लखनौच्या संघाला अजून एक आनंदाची बातमी मिळाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. लखनौच्या संघाला सामना संपल्यावर कोणती आनंदाची बातमी मिळाली, पाहा...लखनौच्या संघाने पंजाबपुढे विजयासाठी १५४ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान माफक वाटत असले तरी पंजाबच्या फलंदाजांना यावेळी लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि त्यामुळेच त्यांना पराभव पत्करावा लागला. पण सामना संपला आणि लखनौच्या संघासाठी अजून एक आनंदाची बातमी आली. कारण हा सामना सुरु होण्यापूव्री लखनौचे १० गुण होते आणि ते चौथ्या क्रमांकावर होते. पण त्यांना पंजाबवर २० धावांनी विजय साकारला आणि त्यांनी दोन गुणांची कमाई केली. या दोन गुणांसह त्यांनी गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबादला पिछाडीवर टाकत १२ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. तत्पूर्वी, लखनौच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. पंजाबचा हुकमी गोलंदाज असलेल्या कागिसो रबाडाने यावेळी लखनौच्या संघाला मोठा धक्का दिला. रबाडाने यावेळी तिसऱ्या षटकात लखनौचा कर्णधार लोकेश राहुलला बाद केले आणि संघाला मोठे यश मिळवून दिले. राहुलला यावेळी सहा धावांवर समाधान मानावे लागले. लखनौला हा मोठा धक्का बसला असला तरी त्यानंतर सलामीवीर क्विंटन डीकॉक आणि दीपक हुडा यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. राहुल बाद झाल्यावर या दोघांनी संयतपणे फलंदाजी केली. पण त्यानंतर मात्र या दोघांनी पंजाबच्या गोलंदाजीचा समाचार घ्यायला सुरुवात केली. या दोघांनी दमदार फटकेबाजी करत लखनौच्या धावसंख्येला चांगला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण पंजाबच्या संदीप शर्माने यावेळी डीकॉकला बाद केले आणि पंजाबला दुसरा धक्का दिला. डीकॉक आणि हुडा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी रचली. डीकॉकने यावेळी ३७ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४६ धावांची खेळी साकारली. डीकॉक बाद झाला आणि त्यानंतर काही वेळातच दीपकही धावचीत झाला. लखनौचे कमी वेळात हे दोन फलंदाज बाद झाले आणि ते बॅकफूटवर ढकलले गेले. दीपकने यावेळी २८ चेंडूंत १ चौकार आणि दोन षटकारांसह ३४ धावा केल्या. दीपक बाद झाला आणि त्यानंतर लखनौचा डाव कोसळल्याचे पाहायला मिळाले. एकेकाळी लखनौचा संघ मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. पण त्यांना यावेळी १५३ धावांवरच समाधान मानावे लागले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/tyxQ31i
No comments:
Post a Comment