वर्धा: पाचोडहून आर्वीला विवाह सोहळ्यासाठी जात असलेल्या वाहनाला होऊन दोघे ठार तर १९ जण जखीमी झाले आहेत. बेढोण्यापुढे असलेल्या घाटात वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. (two persons were lost lives and 19 others were injured in a road accident at wardha) क्लिक करा आणि वाचा- पाचोड येथील एका मुलीचे लग्न आर्वी येथे आयोजित करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यााठी पाचोड गावातील सुमारे २० जण एका गाडीने जात होते. बेढोण्यापुढे असलेल्या घाटामध्ये वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही बोलेरो उलटली. त्यात प्रवास करणारे प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. अपघातातील गंभीर जखमींना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे दोन जखमींचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. क्लिक करा आणि वाचा- वासुदेव लालसिंग चव्हाण, प्रेमसिंग धनसिंग जाधव अशी या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या अपघातात एकूण १९ जण जखमी आले आहे. या सर्व जखमींची नावे खालीलप्रमाणे आहेत- १. गोलू हेमराज जाधव २. गायत्री किसन जाधव ३. चंचल हेमराज जाधव ४. सबूबाई जाधव ५. गुणवंता जाधव ६. राजेश जाधव ७. प्रीतम जाधव ८. यशोदा पवार ९. पार्वती राठोड १०. भवरी राठोड ११. सुमन राठोड १२. कमलनाथ जाधव १३. अनिल राठोड १४. बबली राठोड १५. अर्जुन जाधव १६. अंजली राठोड १७. कल्पना राठोड १८. लखन राठोड १९. शोधार्थ राठोड क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/1Xt8hrd
No comments:
Post a Comment