जळगाव: जळगावातील तरुणाने दाखवित नागपुरातील तरुणीवर तब्बल सात महिने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी सोमवार, ११ एप्रिल रोजी तरुणीच्या फिर्यादीवरुन तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शहर पोलिसांनी शहरातील गेंदालाल मिल येथील संशयित तरुणाला अटक केली आहे. दानिश मुलतानी (रा. गेंदालाल मिल) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. या तरुणाने इन्स्टाग्रामवरून या तरूणीशी ओळख केली. त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढत जाऊन ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. (a young man in nagpur sexually abused a young woman for 7 months on the ) पीडित तरुणी ही नागपूर जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. २०२१ मध्ये दिवाळीमध्ये तिची इन्स्टाग्रामवर जळगावातील गेंदालाल मिल येथील दानिश मुलतानी याच्याशी ओळख झाली. पुढे या ओळखीचे रुपांतर प्रेमात होवून दोघांचे मोबाईलवर बोलणे सुरु झाले. यादरम्यान तरुणीचे तिच्या समाजातील तरुणासोबत लग्न ठरले. यादरम्यान दानिश याने तरुणीला फोन करुन मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्याशी लग्न करेन असे सांगितले. तसेच लग्नाचे आमिष दाखवित दानिश याने वेळावेळी नागपूरातील लॉज, तसेच जळगावात तरुणीवर शारीरिक अत्याचार केले. क्लिक करा आणि वाचा- ४ एप्रिल रोजी तरुणी जळगावात आली. दानिशच्या कुटुंबीयांना भेटली. ७ एप्रिलपर्यंत ती जळगावात राहिली. त्यानंतर दानिशच्या मित्रांनी तिला मलकापूर येथे सोडले. तरुणी कशीबशी नागपुरातील तिच्या मावशीकडे पोहोचली. यादरम्यान तरुणीने दानिशला फोन केले. आपल्याला घ्यायला येण्याची तिने त्याला विनंती केली. मात्र त्याने येण्यास नकार दिला आणि तरुणीला जळगाववा येण्यास सांगितले. क्लिक करा आणि वाचा- तरुणीला जळगावात बोलावले अन् फोन केला स्विच ऑफ पीडित तरुणी एकटीच जळगावात आली. यादरम्यान दानिशने त्याचा फोन बंद करुन ठेवला. फोन लागत नसल्याने तरुणी जळगावात नुतन मराठा महाविद्यालयाजवळ पोहचली. दानिशसोबत संपर्क होत नसल्याने तरुणी हताश झाली व याच ठिकाणी रडत बसली. त्यावेळी काही तरुणांचे तिच्याकडे लक्ष गेले. तरुणांना पीडित तरुणीने आपबिती कथन केली. त्यानंतर तरुणांनी तिला एका समाजसेविकेकडे नेले. समाजसेविकेच्या मदतीने या तरुणी तक्रारी दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात पोहचली. क्लिक करा आणि वाचा- तरुणीच्या तक्रारीनुसार शहर पोलिसात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होऊन काही तासातच तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने संशयित दानिश यास गेंदालाल मिलमधून अटक केली. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rYs9qzx
No comments:
Post a Comment