मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते हे 'मनसे'चे प्रमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. ही भेट राजकीय आहे की वैयक्तिक हे अद्याप स्पष्ट नाही. पण या भेटीने राजकीय चर्चा आता रंगू लागल्या आहेत. आताची ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड आहे. 'मनसे' प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाजपला सॉफ्ट कॉर्नर ठेवत महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंच्या भाषणाचं आज कौतुक केलं. अशातच भाजपचे नेते नितीन गडकरी राज ठाकरेंच्या मुंबईतील निवासस्थानी रात्री १० वाजेच्या सुमारास पोहोचले. यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसह इतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप आणि 'मनसे' युतीची ही चर्चा सुरू आहे. राज ठाकरे हे नवीन घरी शिफ्ट झाले आहेत. राज ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. यानुसार नितीन गडकरी राज ठाकरेंकडे पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पण शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेल्याने हिंदुत्वाची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहे. गुढीपाडवा मेळाव्यात हिंदुत्वाचे कार्ड खेळले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहून बरे वाटले. उत्तर प्रदेशातील जनता विकासाच्या मुदद्यावरून मत देत आहे, हे पाहून चांगलं वाटलं. अयोध्या दौऱ्यावर जाण्याचे संकेतही राज ठाकरे यांनी दिले. तसंच मशिदीवरील भोंगे हटवा अन्यथा मंदिरांवर भोंगे लावून हनुमान चालीसा पठण केली जाईल. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तीन नंबरचा पक्ष पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला फिरवत आहे. राज्याच्या काय देशाच्या राजकारणात असा प्रकार कधी पाहिला नाही. राज्यातील जनतेने शिवसेनेला शरद पवार आणि काँग्रेससोबत जाण्यासाठी मतं दिली नव्हती. मग अशा गद्दारी करणाऱ्या राजकीय पक्षांना जनता कोणतं शासन देणार, असा सवाल करत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर जोरदार प्रहार केला होता. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावरही हल्ला चढवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जातीपातीचे राजकारण करत आला. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला. त्यापूर्वी महाराष्ट्रात जात हा विषय केवळ अभिमानापुरता मर्यादित होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात दुसऱ्या जातींबद्दल द्वेष निर्माण झाला. मराठा आरक्षण आणि अन्य मुद्द्यांवरून आमिषं दाखवून समाजात फूट पाडण्यात आली, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Bnp8IRg
No comments:
Post a Comment