मुंबई : महेंद्रसिंग धोनीने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत विजय साकारला होता. पण पंजाबविरुद्ध मात्र बेस्ट फिनिशर होण्यात धोनी अपयशी ठरला. शिखर धवनच्या नाबाद ८९ धावांच्या जोरावर पंजाबने चेन्नईला विजयासाठी १८८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात वाईट झाली. पण अंबाती रायुडूने ३९ चेंडूंमध्ये सात चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ७८ धावांची तुफानी खेळी साकारली. पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. त्यानंतर धोनीने अखेरच्या षटकात दमदार फटकेबाजी केली, पण त्याला चेन्नईला विजय मिळवून देता आला नाही. त्यामुळे चेन्नईला या सामन्यात ११ धावांनी पराभव पत्करावा लागला. पंजाबच्या १८८ धावांचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. रॉबिन उथप्पाच्या रुपात चेन्नईच्या संघाला यावेळी पहिला धक्का बसला. उथप्पाला यावेळी एकाच धावेवर समाधान मानावे लागले. त्यानंतर चेन्नईच्या संघाला लवकरच अजून एक धक्का बसला. उथप्पानंतर मिचेल सँटनरच्या रुपात दुसरा धक्का बसला. सँटनरला यावेळी ९ धावा करता आल्या. या दुसऱ्या धक्क्यातून चेन्नईचा संघ सावरत आहे, असे वाटत असताना त्यांना तिसरा धक्काही बसला. चेन्नईचा धडाकेबाज फलंदाज शिवम दुबेला यावेळी पंजाबलाविरुद्धच्या सामन्यात मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. दुबेला यावेळी आठ धावांवरच समाधान मानावे लागले. एका बाजूने चेन्नईला धक्के बसत असताना संघाचा धावपलक हलता ठेवण्याची जबाबदारी ऋतुराज गायकवाट पार पाडत होता. पण यावेळी ऋतुराजला यावेळी सेट झाल्यावरही मोठी खेळी साकारता आली नाही. ऋतुराज यावेळी ३० धावांवर बाद झाला. चेन्नईला आतापर्यंत चार धक्के बसले होते आणि त्यांच्या विजयाची आशा धुसर होत होती. पण यावेळी अंबाती रायुडू हा चेन्नईच्या संघासाठी धावून आला. रायुडूने यावेळी धडाकेबाज अर्धशतक साकारलेच, पण त्यानंतरही त्याने मोठी फटकेबाजी केली. तत्पूर्वी, शिखर धवनच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सला चेन्नई सुपर किंग्सपुढे १८८ धावांचे आव्हान ठेवता आले. धवनने सुरुवात जरी संयतपणे केली असली तरी स्थिरस्थावर झाल्यावर एखादा फलंदाज कशी फटकेबाजी करू शकतो, याचा उत्तम नमुना धवनने यावेळी दाखवून दिला. धवनने यावेळी ३७ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले, पण त्याचबरोबर आयपीएलमधील सहा हजार धावाही पूर्ण केल्या. धवनने यावेळी ५९ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद ८८ धावांची खेळी साकारली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hDGczTk
No comments:
Post a Comment