Breaking

Wednesday, April 13, 2022

संतोष पाटील आत्महत्या: कर्नाटकातील भाजपच्या मंत्र्यावर गंभीर आरोप; गुन्हा दाखल https://ift.tt/YNaks6q

मंगळुरू: कर्नाटकातील एका कंत्राटदाराच्या मृत्यूप्रकरणी राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईश्वरप्पा यांचे नाव या प्रकरणी प्रथम आरोपी म्हणून नोंदण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील सत्य जाणून घेण्यासाठी आपण ईश्वरप्पा यांच्याशी बोलणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे. ( Contractor Updates ) वाचा : (३७) असे मृत कंत्राटदाराचे नाव असून, त्यांचा मृतदेह उडुपी येथील लॉजमध्ये मंगळवारी सापडला. त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संतोष यांनी अलीकडेच भाजपचे मंत्री ईश्वरप्पा आणि त्यांचे कर्मचारी रमेश व बसवराज यांच्यावर लाचखोरीचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याची तक्रार त्यांचे भाऊ यांनी केल्यानंतर मंगळवारी रात्री ईश्वरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीत नमूद केले आहे की, २०२०-२१मध्ये हिंडलगा गावातील रहिवाशांनी ईश्वरप्पा यांची भेट घेऊन पाण्याचा निचरा करण्यासाठी नाली, रस्ते आणि फूटपाथ बांधण्याची विनंती केली होती. ईश्वरप्पा यांनी या कामाला परवानगी दिली. कामाचे कंत्राट संतोष यांना देण्यात आले. संतोष यांनी कामासाठी चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती आणि त्याचे बिल अद्याप बाकी आहे. संतोष यांनी मंत्री ईश्वरप्पांची अनेकदा भेट घेतली आणि त्यांना बिल मंजूर करण्याची आणि निधी देण्याची विनंती केली; मात्र त्यासाठी ईश्वरप्पा यांचे निकटवर्तीय बसवराज आणि रमेश हे संतोषकडे ४० टक्के कमिशनची मागणी करीत होते. वाचा : दरम्यान, संतोष यांच्या मृत्यूनंतर कर्नाटकमध्ये राजकीय वादंग निर्माण झाला. काँग्रेस नेते यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांना लक्ष्य करून ईश्वरप्पा यांना हटवण्याची मागणी केली आहे, तर या प्रकरणातील आरोपींना अटक झाल्याशिवाय संतोष यांच्या मृतदेहाचा ताबा घेणार नाही, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. ‘राजीनामा देणार नाही’ संतोष पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी विरोधकांकडून दबाव वाढत असताना मंत्री ईश्वरप्पा यांनी मात्र पदाचा राजीनामा देणार नसल्याचे सांगितले. ‘व्हॉट्सअ‍ॅप संदेशाला ‘ डेथ नोट ’ कसे मानता येईल? असा संदेश कुणीही टाइप करू शकतो,’ असे ईश्वरप्पा यांनी म्हटले आहे. संतोष पाटील यांच्या मृत्यूमागील कटाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/km549hj

No comments:

Post a Comment