मुंबई: राजस्थान रॉयल्सकडून गेल्या हंगामात सर्व १४ सामने खेळणाऱ्या याला या वर्षी दिल्ली कॅपिटल्सने ४.२ कोटींनी खरेदी केले. चेतनने भारताकडून दोन टी-२० आणि १ वनडे मॅच खेळली आहे. पण आयपीएल २०२२ त्याला एकही संधी मिळाली नव्हती. गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात चेतनला हंगामातील पहिली मॅच खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने स्वत:चे नाणे किती खणखणीत आहे हे दाखवून दिले. वाचा- दिल्लीची या हंगामातील ही आठवी मॅच आहे. कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. जलद गोलंदाज चेतन सकारियाने दुसऱ्या ओव्हरमध्ये केकेआरला पहिला झटका दिला. त्याने सलमीवीर आरोन फिंचला ३ धावांवर बोल्ड केले. चेतनने फुल इनस्विंग चेंडू टाकला ज्यावर फिंच बोल्ड झाला. हंगामातील पहिला सामना खेळणाऱ्या चेतनने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये मोठी विकेट घेतली आणि याचा आनंद देखील तितकाच झाला. वाचा- फिंचला बोल्ड काढल्यानंतर चेतनने खास स्टाइलने जल्लोष केला. त्याने जपानी अॅक्शन कार्टून सीरीजमधील ड्रेगन बॉल झेडचा कॅरेक्टर गोकूच्या सिग्नेचर स्टाइलमध्ये जल्लोष केला. अशा प्रकारे जल्लोष फुटबॉलपटू पियरे-एमरिक ऑबमेयांग देखील करतो. गेल्या हंगामापर्यंत चेतन मार्वल सुपरहिरोची सिरीज ब्लॅक पॅथरची नकल करत असे. आता नव्या हंगामात त्याने विकेट घेतल्यानंतर जल्लोष करण्याची स्टाईल देखील बदलली. वाचा- वाचा- फुटबॉलपटू पियरे-एमरिक ऑबमेयांग हा इंग्लिश क्लब ऑर्सेनलकडून खेळतो. तो गॅबॉनच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार आहे. त्याचे वडील गॅबोनीज हे देखील फुटबॉलपटू होते. २०१६ साली त्याला जगातील आठव्या क्रमांकाचा फुटबॉलपटू म्हणून गौरविण्यात आले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/IitS4V2
No comments:
Post a Comment