मुंबई : मुंबई इंडियन्सला या आयपीएलमध्ये पहिल्यांदा विजयाचे स्वप्न दाखवले ते डॅनियम्ल सॅम्सने. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवत त्याने जसप्रीत बुमराची आठवण करून दिली. चेन्नईच्या चार फलंदाजांना बाद करत त्याने मुंबईला विजयाचे स्वप्न दाखवले होते. पण मुंबईचे हे स्वप्न बेचिराख झाले. पण मुंबईसाठी हुकमी एक्का ठरू शकणार डॅनियल सॅम्स आहे तरी कोण, याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. डॅनियल सॅम्सने यावेळी मुंबईसाठी हा सामना एकहाती फिरवल्याचे पाहायला मिळाले. कारण सॅम्सने डावाच्या पहिल्याच चेंडूवर चेन्नईचा धडाकेबाज सलामीवीर ऋतुराज गायकवाडला बाद केले. सॅम्सने हा पहिला धक्का चेन्नईला दिला होता. पण त्यावरच सॅम्स थांबला नाही. त्यानंतर सॅम्सने आपल्या दुसऱ्या षटकात चेन्नने फटकेबाजी करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर पाठवलेल्या मिचेल सँटनरचाही काटा काढला आणि चेन्नईची २ बाद १६ अशी अवस्था केली होती. त्यानंतर चेन्नईच्या रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायुडू यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. उथप्पा बाद झाल्यावरही रायुडू मात्र खेळपट्टीला चिटकून होता आणि दमदार फलंदाजी करत तो चेन्नईच्या दिशेन सामना घेऊन जात होता. पण यावेळी पुन्हा एकदा मुंबईच्या मदतीसाठी धावून आला तो सॅम्स. कारण सॅम्सने यावेळी रायुडू ४० धावांवर असताना त्याला पोलार्डकडे झेल देण्यास भाग पाडले आणि मुंबईला मोठे यश मिळवून दिले. कारण रायुडू जर खेळपट्टीलवर टिकला असता तर मुंबईचा पराभव निश्चित झाला असता. पण सॅम्सने यावेळी रायुडूचा काटा काढला आणि मुंबईला सर्वात मोठे यश मिळवून दिले. चेन्नईसाठी आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या शिवम दुबे यालाही सॅम्सनेच यावेळी स्वस्तात बाद केले. सॅम्सने या सामन्यात बळींचा चौकार लगावला आणि मुंबईसाठी मोलाची कामगिरी केली. आतापर्यंत मुंबईची गोलंदाजी ही कमकुवत दिसत होती. त्याचबरोबर संघातील जसप्रीत बुमराला साथ देणारा दुसरा गोलंदाज दिसत नव्हता. पण यावेळी सॅम्सने ही कसर भरून काढल्याचे या सामन्यात पाहायला मिळाले. कारण सॅम्सने मुंबईला यावेळी सर्वाधिक विकेट्स तर मिळवून दिल्याच, पण त्याचबरोबर मुंबईसाठी आपण बुमराच्या खांद्याला खांदा लावून गोलंदाजी करू शकतो हे त्याने दाखवून दिले. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून खेळताना सॅम्सने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाने या लिलावात सॅम्सला २ कोटी ६० लाख रुपये मोजत आपल्या संघात ादाखल केले होते आणि त्याचेच फळ आज त्यांना मिळाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/aVL2Xdp
No comments:
Post a Comment