Breaking

Friday, April 22, 2022

मुंबई इंडियन्स हे काय करून ठेवलात? IPLच्या इतिहासातील अनेक लाजीरवाणे विक्रम केले https://ift.tt/TSOdl17

मुंबई: आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सकडे पाहिले जाते. आयपीएल २०२२ला सुरुवात होण्याआधी अन्य सर्व संघ रोहित शर्मा आणि कंपनीला घाबरून असत. पण हंगामाला सुरूवात झाली आणि मुंबईने पहिली लढत गमावली. यावर अनेकांनी मुंबईचा इतिहासच आहे पहिली लढत गमावण्याचा म्हणून लक्ष दिले नाही. पण त्यानंतर जे काही झाले ते मुंबईला आणि त्यांच्या चाहत्यांना कधीच आवडणारे नव्हते. वाचा- ... गुरुवारी चेन्नईविरुद्ध झालेल्या लढतीनंतर मुंबई इंडियन्सच्या नावावर असे काही विक्रम नोंदले गेले आहेत जे आजवर कोणाच्या नावावर नव्हते. वाचा- मुंबई इंडियन्सने मधील सुरुवातीचे सलग सात सामने गमावले आहेत. आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही संघाची इतकी खराब सुरुवात झाली नाही. याआधी हा विक्रम दिल्ली आणि आरसीबीच्या नावावर होता. दिल्लीने २०१३मध्ये तर आरसीबीने २०१९ मध्ये स्पर्धेच्या सुरुवातीलाच सलग सहा सामने गमावले होते. त्यामुळे अशी खराब कामगिरी करणारा मुंबई पहिला संघ ठरला आहे. वाचा- ... आयपीएलमध्ये एखाद्या संघाने सलग सहा सामने गमावण्याची ही ११वी वेळ आहे. पण आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या एकाही संघाने सलग ६ सामने कधी गमावले नाहीत. वाचा- ... आयपीएल २०२२मधील आतापर्यंतची मुंबईचा कामगिरी >> दिल्लीकडून ४ विकेटनी पराभूत >> राजस्थानकडून २३ धावांनी पराभूत >> केकेआरकडून ५ विकेटनी पराभूत >> आरसीबीकडून ७ विकेटनी पराभू >> पंजाबकडून १२ धावांनी पराभूत >> लखनौकडून १८ धावांनी पराभूत >> चेन्नईकडून ३ विकेटनी पराभूत वाचा- मुंबई इंडियन्सचे आयपीएल २०२२मधील शिल्लक लढती २४ एप्रिल- विरुद्ध लखनौ ३० एप्रिल- विरुद्ध राजस्थान ०६ मे- विरुद्ध गुजरात ०९ मे- विरुद्ध केकेआर १२ मे- विरुद्ध चेन्नई १७ मे - विरुद्ध हैदराबाद २१ मे- विरुद्ध दिल्ली


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dgi5x4B

No comments:

Post a Comment