मुंबई :अपक्ष आमदार रवी राणा आणि अपक्ष खासदार नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी भाजप नेते खार पोलीस ठाण्यात गेले होते. किरीट सोमय्या खार पोलीस ठाण्यात गेल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिकांना बाजूला करुन किरीट सोमय्यांची गाडी तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान एका शिवसैनिकांनं गाडीवर दगड भिरकावल्याने गाडीची काच फुटली. किरीट सोमय्या या घटनेत किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्या चेहऱ्याला थोडीशी दुखापत झाली आहे. पंचनामा होत नाही तोपर्यंत किरीट सोमय्यांनी गाडीतून खाली उतरणार नसल्याची भूमिका घेतली आहे. किरीट सोमय्यांनी या घटनेनंतर धक्का बसल्याचं म्हटलं आहे. सोमय्यांनी या घटनेनंतर भाजप नेत्यांशी चर्चा देखील केली आहे. गाडीवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी वांद्रे पोलिसात धाव घेतली आहे. किरीट सोमय्या यांच्या गाडीवर फेकण्यात आलेला दगड देखील त्यांनी पोलिसांना आणि माध्यमांना दाखवला. सोमय्या आता वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर सोमय्या आक्रमक पोलीस स्टेशनच्या आवारात शिवसैनिकांचे ७० ते ८० गुंड कसे पोहोचले आहेत. पोलीस आयुक्त जोपर्यंत इथं येऊन अधिकाऱ्यांना सस्पेंड करत नाहीत तोपर्यंत या ठिकाणाहून हलणार नाही. पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसैनिक हल्ला करतात. उद्धव ठाकरे यांच्या गुंडांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले. पोलीस आयुक्त संजय पांडे उद्धव ठाकरे यांचे नोकर असल्यासारखे वागत आहेत, असा आरोपही किरीट सोमय्यांनी केला. गुंडांनी हल्ला केला म्हणणाऱ्या सोमय्यांना पेडणकरांचं उत्तर दोन दिवसांपासून असंतोषाचं वातावरण राणा दाम्पत्यानं निर्माण केला. यापूर्वी त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. आज त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्याकडे मदत मागितली. यामुळं हायव्होल्टेज ड्रामा भाजपच्या माध्यमातून राणा कंपनीकडून करण्यात आला असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. एवढं सगळं होऊनही किरीट सोमय्या साडे नऊ वाजता मी तिकडे पोहोचतोय असं सांगतात. शिवसैनिकांची माथी भडकवू नका, असं विनंतीपूर्वक सांगून देखील महाराष्ट्रात, मुंबईत अराजक पाहिजे यासाठी ते प्रयत्न करतात. मातोश्री, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे या संवेदनशील विषयात हात घातला की शिवसैनिक भडकणार हे माहिती होतं. मात्र, मुद्दाम हे करण्यात आलं आहे. हायव्होल्टेज ड्रामा हनुमान जयंतीपासून सुरु झाला त्याची परिनिती आजच्या घटनेत झाली. माध्यमं चौथा स्तंभ आहे, तुम्ही देखील विचारलं पाहिजे. खरंच त्यांना तिथे जाण्याची गरज होती का?, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/axij0TR
No comments:
Post a Comment