मुंबई: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारला दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमारने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. करोनाची लागण झाल्यामुळे आता अक्षय कुमारला कान्स फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावता येणार नाही. अक्षय कुमारने () आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने मी कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होऊ शकत नाही. याचं मला खूप वाईट वाटत आहे. पण कान्स चित्रपट महोत्सावाला माझ्या शुभेच्छा आहेत, असे अक्षय कुमारने सांगितले. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला ए.आर. रहमान, आर. माधवन, नवाजुद्दीन सिद्दिकी, नयनतारा, तमन्ना भाटिया आणि शेखर कपूर हे सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. अक्षय कुमारला गेल्यावर्षी एप्रिल महिन्यातही करोनाची लागण झाली होती. राम सेतू चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना अक्षयला करोनाने गाठले होते. यावेळी राम सेतू चित्रपटाच्या क्रू मधील आणखी काही सदस्यांनाही झाला होता. त्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवावे लागले होते. दरम्यान, लवकरच अक्षय कुमारचा 'पृथ्वीराज' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय आहे. ३ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटात हा पृथ्वीराज चौहान आणि मानुषी छिल्लर ही संयोगिताच्या भूमिकेत दिसेल. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान अक्षय कुमार म्हणाला होता, देशभरातील शाळांनी विद्यार्थ्यांना 'पृथ्वीराज' चित्रपट दाखवणं अनिवार्य करावे, असे अक्षय कुमारने म्हटले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/grMfiHt
No comments:
Post a Comment