नवी दिल्ली: दिल्लीतील मुंडका येथील एका तीन मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती अग्निशमन दलाला दुपारी ४.४० च्या सुमारास मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर दिल्ली पोलिसांनी १४ मृतदेह सापडल्याची माहिती दिली आहे. ( broke out in mundka building in delhi) या भीषण आगीबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही इमारत तीन मजली आहे आणि सामान्यतः कंपन्यांना कार्यालयाची जागा देण्यासाठी वापरण्यात येणारी व्यावसायिक इमारत आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पहिल्यांदा आग लागली, नंतर आगीने रौद्र धारण केलं, पुढे दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आग लागली. दरम्यान, या आगीप्रकरणी कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही आग लागताच इमारतीत घबराट पसरले. लोक मिळेल त्या मार्गाने पळू लागले. अनेकांनी इमारतीच्या काही मजल्यांवरून खाली उड्या घेत आपला जीव वाचवला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण २५ गाड्या घटनास्थळी तातडीने हजर झाल्या आहेत. जळालेल्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. उन्हाळ्यात वारंवार आगी लागण्याच्या घटना समोर येत आहेत. आगीचे कारण अस्पष्ट ही आग कशामुळे लागली, कारण काय, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार स्थानिक लोक पोहोचले आणि त्यांनी प्रथम मदत आणि बचाव कार्य सुरू केले. राष्ट्रपती कोविंद यांच्याकडून शोक व्यक्त दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे. दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने मला दुःख होत आहे. शोकग्रस्त कुटुंबीयांना माझ्या संवेदना. जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे, असे राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/eUFA9o4
No comments:
Post a Comment