CSKvsMI, मुंबई : मुंबई आणि चेन्नई या दोन्ही तगड्या संघांमध्ये आजचा सामना होणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. चेन्नईला पराभूत केल्यावर कशी होती मुंबई इंडियन्सची पहिली प्रतिक्रीया, पाहा खास व्हिडिओ चेन्नईचा खेळ केला मुंबई इंडियन्सने खल्लासमुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर पाच विकेट्स राखून विजय साकारला. या विजयासह मुंबईला कोणताही फरक पडणार नव्हता, पण या पराभवामुळे मात्र चेन्नईचे या आयपीएमधील आव्हान संपुष्टात आले आहे. चेन्नईचा मुंबई इंडियन्सला पाचवा धक्काचेन्नईच्या मोईन अलीने यावेळी मुंबईच्या ह्रतिक शोकिनला १८ धावांवर बाद केले, त्यामुळे मुंबईची यावेळी ५ बाद ८१ अशी स्थिती झाली होती. मुकेश चौधरीने एकाच षटकात दिले दोन धक्केचेन्नईचा युवा गोलंदाज मुकेश चौधरीने यावेळी पाचव्या षटकात मुंबईला दोन धक्के दिले. पाचव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर डॅनियल सॅम्सला बाद केले आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर ट्रिस्टान स्टब्सला बाद केले. त्यामुळे मुंबईची ४ बाद ३३ अशी अवस्था झाली होती. रोहित शर्मा आऊट, मुंबईला मोठा धक्कामुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आऊट झाला आणि मुंबईला मोठा धक्का बसला. रोहितला यावेळी १४ चेंडूंत १८ धावा करता आल्या. इशान किशन आऊट, मुंबईला पहिला धक्कामुंबईच्या संघाला यावेळी पहिल्यात षटकात इशान किशनच्या रुपात मोठा धक्का बसला. इशानला यावेळी फक्त सहा धावाच करता आल्या. चेन्नईचा डाव आटोपला...मुंबई इंडियन्सच्या संघाने यावेळी तिखट मारा केला आणि चेन्नईचा डाव फक्त ९७ धावांमध्ये आटोपला. धोनीने यावेळी एकाकी झुंज देत नाबाद ३६ धावांची खेळी साकारली. चेन्नईच्या संघाला नववा धक्कामहिशाच्या रुपात यावेळी चेन्नईच्या संघाला नववा धक्का बसला, त्याला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. सिमरनजित सिंग आऊट, चेन्नईला आठवा धक्काचेन्नईच्या संघाला सिमरनजितच्या रुपात यावेळी आठवा धक्का बसला, चेन्नईची यावेळी ८ बाद ८० अशी स्थिती झाली होती. ड्वेन ब्राव्हो आऊट, चेन्नईला सातवा धक्काचेन्नईला अमुभवी खेळाडू ड्वेन ब्राव्हो सावरेल, असे वाटत होते. पण ब्राव्हो यावेळी १२ धावांवर आऊट झाला आणि चेन्नईला सातवा धक्का बसला. शिवम दुबे आऊट, चेन्नईला सहावा धक्काशिवम दुबेच्या रुपात चेन्नईच्या संघाला यावेळी सहावा धक्का बसला, त्याला १० धावा करता आल्या. फक्त २९ धावांमध्येच चेन्नईचा अर्धा संघ गारदचेन्नईच्या संघावर या सामन्यात नामुष्की ओढवली, कारण फक्त २९ धावांत त्यांना पाच फलंदाज गमवावे लागले. अंबाती रायुडू हा चेन्नईचा बाद होणार पाचवा फलंदाज ठरला, त्याला १० धावा करता आल्या. ऋतुराज गायकवाड आऊट, चेन्नईला चौथा धक्कासलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या रुपात चेन्नईला यावेळी चौथा धक्का बसला. ऋतुराजला यावेळी फक्त सात धावा करता आल्या. रॉबिन उथप्पा आऊट, चेन्नईला तिसरा धक्कारॉबिन उथप्पाच्या रुपात यावेळी चेन्नईला तिसरा धक्का बसला, त्याला फक्त एकच धाव काढता आली. पहिल्याच षटकात मुंबईचा चेन्नईला दुसरा धक्काडॅनियल सॅम्सने पहिलयाच षटकात चेन्नईला दुहेरी धक्के दिले. सॅम्सने दुसऱ्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवेला बाद केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर मोइन अलीलाही त्याने शून्यावर बाद केले. दुसऱ्याच चेंडूवर मुंबईने चेन्नईला दिला पहिला धक्कामुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सने पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चेन्नईच्या डेव्हॉन कॉनवेला बाद केले. कॉनेला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, काय निर्णय घेतला पाहा...चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली. रोहित शर्माने यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ShJApsT
No comments:
Post a Comment