Breaking

Tuesday, May 3, 2022

धक्कादायक: गोहत्येच्या संशयावरून दोन युवकांची हत्या; बजरंग दलावर आरोप https://ift.tt/2p6PyiF

सिवनी: मध्य प्रदेशातील जिल्ह्यात गोहत्येच्या संशयावरून दोन आदिवासी युवकांची जमावाकडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जमावाच्या हल्ल्यात अन्य एक युवक जखमी असून त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ( ) वाचा : मध्य प्रदेशातील खरगोन येथे १० एप्रिल रोजी हिंसाचार भडकला होता. ही घटना ताजी असतानाच आता तीन आदिवासी युवकांवर १५ ते २० जणांच्या जमावाने हल्ला केल्याने व त्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सिवनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात सिमरिया गावात ही घटना घडली. गोहत्येच्या संशयावरून सिमरिया गावात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तीन युवकांना पकडले. त्यानंतर जमावाने तिन्ही युवकांना बेदम मारहाण केली. त्यात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तणावाचे वातावरण पसरले आहे. आदिवासी समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आदिवासींनी रस्त्यावर उतरत कुरई येथे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. स्थानिक आमदार अर्जुन काकोडिया यांनीही घटनास्थळी भेट दिली असून शिवराज सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात ज्याप्रमाणे इतर गुन्हेगारांच्या घरांवर बुलडोझर चालवला जात आहे त्याचप्रमाणे या घटनेतील आरोपींच्या घरावरही तत्काळ बुलडोझर चालवला पाहिजे, अशी मागणी काकोडिया यांनी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सिवनीचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी आमदार काकोडिया यांची समजूत काढत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. वाचा : नेमकं काय घडलं? पंधरा ते वीस जणांच्या जमावाने सोमवारी रात्री तीन वाजताच्या सुमारास तीन आदिवासी युवकांवर हल्ला केला. याप्रकरणी एकूण २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. ठरलेल्या दोन्ही युवकांच्या घरातून काही प्रमाणात मांस जप्त करण्यात आले असून त्याची तपासणी करण्यात येत आहे. तक्रारदार ब्रजेश बट्टी या हल्ल्यात जखमी असून संपत बट्टी आणि धनसा या दोघांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हा हल्ला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आमदार काकोडिया यांनी केला आहे. पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये मदत देण्याची मागणीही त्यांनी केली. काँग्रेस नेते यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून बजरंग दलावर आरोप केला आहे. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/q6xjvli

No comments:

Post a Comment