Breaking

Saturday, May 14, 2022

फिनलँडचा १० सेकंदात बंदोबस्त करु, रशियाची नाटोच्या मुद्द्यावरुन धमकी https://ift.tt/ilN9vH2

मॉस्को: रशियानं यूक्रेनच्या नाटोतील सहभागाच्या भीतीनं २४ फेब्रुवारीपासून युद्धाला सुरुवात केली. आता नाटोचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. फिनलँडनं नाटोत सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं आहे. यामुळं संतप्त झाला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यानं ब्रिटनवर अणवस्त्र हल्ला करण्याची धमकी दिली आहे. तर, फिनलँडचा बंदोबस्त करण्यास १० सेकंद लागतील, असा इशारा दिला आहे. ड्युमाच्या रक्षा समितीचे व्हाईस चेअरमन अलेक्सी जुरावलेव यांनी हा दावा केला आहे. दुसरीकडे रशियाचं सैन्य यूक्रेनविरुद्ध बॅकफूटवर असताना आणि स्वीडननं नाटोमध्ये सहभागाची इच्छा जाहीर केली आहे. फिनलँडनं नाटोमध्ये सहभागी होणार असल्याची इच्छा जाहीर केल्यानंतर रशियानं वीज पुरवठा बंद केला आहे. फिनलँड रशियाकडून त्यांच्या एकूण विजेच्या गरजेपैकी १० टक्के वीज खरेदी करतो. जुरावलेव यांनी फिनलँड नाटोत सहभागी होऊन आमच्या देशाच्या सुरक्षेबद्दल आणि अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण करत आहेत.जर अमेरिका आम्हाला धमकी देणार असेल तर आमच्याकडे त्यांच्यासाठी सरमत सतान २ मिसाईल आहे. तुम्ही रशियाच्या अस्तित्त्वाला मिटवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमची राख होईल, असा इशारा दिला आहे. फिनलँड अमेरिकेसोबत असल्याचं म्हणत आहे. मात्र, आतापर्यंत देश म्हणून अस्तित्त्वात आहेत, यासाठी रशियाचं आभार मानले पाहिजेत. फिनलँडच्या सीमेवर अणवस्त्र तैनात करण्याची गरज नाही आम्ही सर्बियातून सरमत द्वारे हल्ला केला तर त्याची ब्रिटनपर्यंत मारा करण्याची क्षमता असल्याचं जुरावलेव म्हणाले. फिनलँडला अमेरिका आणि प्रोत्साहन देत असल्याचा आरोप जुरावलेव यांनी केला. फिनलँडच्या समीवेर आम्ही शस्त्र तैनात करणार नाही. मात्र, तिथं अशा प्रकारच्या मिसाईल असतील त्या १० सेकंदात फिनलँडपर्यंत पोहोचतील, असं जुरावलेव म्हणाले. फिनलँडला नाटोतील सहभागासाठी अमेरिका आणि ब्रिटन प्रोत्साहित करत असल्याचा आरोप जुरावलेव यांनी केला. दुसरीकडे रशिया आणि यूक्रेन युद्धात रशियन सैन्याची यूक्रेनच्या सैन्याकडून पिछेहाट झाली असल्याची माहिती आहे. रशियानं नाटोच्या मुद्यावरुन युद्धाला सुरुवात केली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/E2CTXLo

No comments:

Post a Comment