मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या वादग्रस्त विधानांनी अनेक वेळा चर्चेत असते. अनेक वेळा ती आपल्या सोशल मीडियावरुन वादग्रस्त पोस्ट करते. आजही तिने ज्येष्ठ नेते यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिली आहे. तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक, अशी वादग्रस्त फेसबुक पोस्ट केतकी चितळेने केली आहे. केतकी चितळे तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर केतकी सोशल मीडियावरून तिचं मत मांडत असते. टोकाची मते लिहिल्याने अनेकदा केतकीला ट्रोल देखील करण्यात आलं आहे. आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत टीका करणारी फेसबुक पोस्ट केतकीने केली आहे. केतकी चितळेने फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय? तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक सगळे पडले उरले सुळे, सतरा वेळा लाळ गळे समर्थांचे काढतो माप, ते तर तुझ्या बापाचेही बाप ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू ? तू तर मच्छर भरला तुझा पापघडा, गप! नाही तर होईल राडा खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड याला ओरबाड त्याला ओरबाड, तू तर लबाडांचा लबाड शरद पवार यांचं साताऱ्यातील भाषण चर्चेत आहे. शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांची कष्टकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना सांगणारी कविता म्हटली. त्या कवितेत पवारांनी हिंदू देवतांचे बाप काढल्याची टीका भाजपने केली. भाजपच्या टीकेला राष्ट्रवादीकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलं. पवारांच्या याच कवितेचा धागा पकडून केतकीने पवारांना ब्राह्मणद्वेष्टा म्हटलं आहे. ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू, तू तर मच्छर, अशा खालच्या शब्दात तिने शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. फेसबुक पोस्टनंतर केतकी चितळे ट्रोल इतक्या खालच्या पातळीला जाऊन टीका करणं म्हणजे तिच्यात किती ठासून विकृती भरली आहे, याचा अंदाज येतोय, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. केतकीला जास्त महत्त्व देऊ नका. तिला अभिनय क्षेत्रात काम नसल्याने अशा वादग्रस्त पोस्ट करुन तिला चर्चेत यायचं असतं, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं आहे. आपलं वय किती, आपण बोलतो किती, आपल्या योग्यतेनुसार आपण बोलावं, आपली लायकी आहे का पवारसाहेबांवर बोलण्याची, असं म्हणत एका नेटकऱ्याने केतकीला सुनावलं आहे. थोडंसं केतकी चितळे विषयी... केतकी चितळे 'तुझं माझं ब्रेकअप' मालिकेतून लोकप्रिय झाली होती. त्यानंतर केतकी फारशी कुठे दिसली नाही. परंतु तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती सतत चर्चेत राहिली आहे. अनेकदा ती सोशल मीडियावर तिची मते मांडत असते. परंतु त्यावरून वादच निर्माण होऊन तिला ट्रोल केले जाते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pMBNGac
No comments:
Post a Comment